Tarun Bharat

राज्यातील सहा इंजिनिअरिंग कॉलेजची मान्यता रद्द

प्रतिनिधी /बेळगाव

विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू) बेळगावने राज्यातील सहा इंजिनिअरिंग कॉलेजची मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. गुणवत्तेचा घसरलेला दर्जा व पुरेशा सुविधा नसल्याने विद्यापीठाने हा निर्णय घेतला. यामध्ये बेळगाव जिल्हय़ातील एका इंजिनिअरिंग कॉलेजचा समावेश आहे.

विद्यापीठाच्या कार्यकारिणी सदस्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासूनच या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. बेंगळूर येथील अल्फा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बेळगाव येथील शेख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बेंगळूर येथील इस्लामिया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, चामराजनगर येथील एकलव्य इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, बेंगळूर येथील श्रीविनायका इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी व बीटीएल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजचा समावेश असल्याची माहिती व्हीटीयूच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार बेंगळूर येथील एक व बेळगाव येथील एका कॉलेज मॅनेजमेंटने आर्थिकदृष्टय़ा कॉलेजचा खर्च परवडत नसल्याने इंजिनिअरिंग अभ्यासक्रम बंद करावा, अशी मागणी व्हीटीयूकडे केली होती. असुविधा तसेच अत्यल्प संख्येने विद्यार्थ्यांचे प्रवेश यामुळे कॉलेज प्रशासनाने हा निर्णय घेतला.

या सहा कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना इतर कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मागील दोन वर्षांमध्ये व्हीटीयूअंतर्गत येणाऱया 12 कॉलेजनी इंजिनिअरिंग अभ्यासक्रम थांबविला आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना कॉलेजची मान्यता पाहूनच प्रवेश घेणे जरूरीचे आहे.

Related Stories

स्वच्छता कामगार भरतीचा घोळ संपता संपेना

Amit Kulkarni

खानापूर-हेम्माडगा रस्त्यावरील खड्डय़ात वाहने रुतण्याच्या प्रकारात वाढ

Amit Kulkarni

रेल्वेस्थानक नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू

Omkar B

सौम्या हुली यांचे दिवाणी न्यायाधीश परीक्षेत यश

Amit Kulkarni

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बेळगाव शुटोकॉन अकादमीचे घवघवीत यश

Amit Kulkarni

संकेश्वरमध्ये बाहेर फिरणाऱयांची धरपकड

Patil_p