नवारस्ता/प्रतिनिधी
हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टी च्या इशाऱ्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे उघडून आज पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय कोयना सिंचन विभागाने घेतला असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.
कोयना धरण सध्या फुल्ल भरले असल्यामुळे पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी जास्त झाल्यास धरणातील पाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.गेल्या आठ दिवसांपासून पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर पूर्णपणे कमी आहे.
मात्र हवामान खात्याने पुढील काही दिवस कोकण किनारपट्टी सह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीचा इशारा असल्याने कोयना धरणातील पाणी पातळी कमी करण्यासाठी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी रात्री 9.00 वाजता कोयना पायथा विजगृहातून 1050 क्यूसेक्स विसर्ग सुरू केला असून आज मंगळवारी सकाळी 9.00 वाजले पासून धरणाचे वक्र दरवाजे उघडून धरणातून एकूण विसर्ग 10000 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करणेत आला आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


previous post