Tarun Bharat

राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचा मार्ग मोकळा

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर  

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्यात ” आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ,महाराष्ट्र ” स्थापन करण्यासाठी पावले उचलली असून येत्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.या विद्यापीठाचे अधिनियम तयार करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव स्वाती मधुकर नानल यांनी २२ एप्रिल २०२० रोजी शासन निर्णय क्रमांक ३०२०/प्र.क.५६ /क्रीयुसे -१ पारीत केला आहे.   

कोणत्याही देशाची प्रगती ही केवळ आर्थिक विकासाच्या कसोटीवर मोजली जात नाही. तर ती शिक्षण,आरोग्य, रोजगार अशा निकषांच्या आधारे मोजली जाते. त्यामध्ये शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले आहे. क्रीडा हा शिक्षणाचा अभिन्न भाग आहे. कोणत्याही देशाची प्रगती ही सर्वाधिक प्रमाणात त्या देशाच्या क्रीडाविभागासह शैक्षणिक गुणवत्तेवर अवलंबून असते. म्हणूनच क्रीडा हा राष्ट्राचा मानबिंदू  मानून आंतरराष्ट्रीय संस्थांनी राष्ट्राच्या विकासाची नवीन मानके निश्चित केली आहेत. त्यापैकी महत्त्वाचा निकष म्हणजे मानवी विकास निर्देशांक होय. या निर्देशांकानुसार राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र सुरू करण्याचे शासनाने प्रस्तावित केले आहे.

Related Stories

भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात तपास यंत्रणेचा गैरवापर : संजय राऊत

Tousif Mujawar

सातारा : शिवाजी विद्यापीठ उपकेंद्रासाठी खावली येथील जागेला तत्वतः मान्यता

Archana Banage

’मीच माझ्या सातारकरांचा रक्षक‘ संस्थेचा माध्यमातून ’सवयभान‘ उपक्रमाची सुरूवात.

Patil_p

सातारा जिल्ह्यात 15 ऑगस्टला कलम 144 लागू

Archana Banage

वन्य प्राण्याच्या हल्ल्यात १४ बाकरी ठार

Archana Banage

..त्याचं तत्परतेनं बहुजन बांधवांनाही नियुक्त्या द्याव्यात : आमदार पडळकर

Archana Banage
error: Content is protected !!