Tarun Bharat

राज्यात आठ जिल्हय़ांमध्ये धाडी

Advertisements

मंगळूर, बेंगळूर, शिमोग्यात ‘पीएफआय’च्या नेत्यांना घेतले ताब्यात

प्रतिनिधी /बेंगळूर

राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी पहाटे एकाचवेळी राज्यातील 8 जिल्हय़ांमध्ये छापे टाकले आहेत. बेंगळूर, मंगळूर, शिमोगा, कलबुर्गी, म्हैसूर, कोप्पळ, बिदर आणि कारवार या जिल्हय़ांत पीएफआय संघटनेच्या नेत्यांची निवासस्थाने आणि  कार्यालयांवर छापे टाकून झडती घेण्यात आली आहे. या कारवाईवेळी 20 हून अधिक नेत्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. दरम्यान, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी या कारवाईमुळे कोणताही धार्मिक हेतू नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मंगळूरमध्ये पीएफआय आणि एसडीपीआय संघटनेच्या जिल्हा कार्यालयांवर धाड टाकून एनआयएच्या अधिकाऱयांनी महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या कारवाईमुळे मंगळूर शहरात खळबळ उडाली. मंगळुरातील नेल्लेकाई रोडवरील कार्यालयासह शहरात 8 ठिकाणी छापे टाकण्यात आले. एसडीपीआय संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुळाई अबुबकर यांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईवेळी सुरक्षेसाठी सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात करण्यात आली होती. कारवाईविरोधात आंदोलनकर्ते आक्रमक होत असल्याने काही जणांना ताब्यात घेण्यात आले.

कलबुर्गी येथे देखील एनआयएने छापे टाकून पीएफआय संघटनेच्या दोन नेत्यांना ताब्यात घेतले आहे. येथील टिपू सुलतान चौक येथून कलबुर्गी जिल्हा पीएफआयचे अध्यक्ष शेख एजाज अली आणि राज्य समितीचे सदस्य शाहिद नसीब यांना एनआयएच्या अधिकाऱयांनी ताब्यात घेतले आहे. एजाज यांच्या निवासस्थानातून 14 लाखांची रोकड जप्त करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कारवाईविरोधात शहरात निदर्शने केली.

म्हैसूरमध्ये शांतीनगर येथे छापा टाकून पीएफआय संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष मौलाना अहमद कलीमुल्ला यांना ताब्यात घेण्यात आले. पहाटे 3ः30 च्या सुमारास 8 अधिकाऱयांच्या पथकाने ही कारवाई केली. सकाळी 6 पर्यंत कलीमुल्ला यांच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली.

संघटनेचा राज्य विभाग अध्यक्ष ताब्यात

शिमोग्यात लष्कर मोहल्ला येथील निवासस्थानावर छापा टाकून एनआयएने पीएफआय संघटनेचा राज्य विभाग अध्यक्ष शाहिद खान यांना ताब्यात घेतले. त्याच्या निवासस्थानी पहाटे 3ः30 ते 6 या वेळेत तपासणी करण्यात आली.

बेंगळूरमध्ये तीन नेते ताब्यात

बेंगळूरमध्ये पीएफआय संघटनेच्या तीन नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. या संघटनेची कार्यालये आणि नेत्यांच्या निवासस्थानांना लक्ष्य करण्यात आले. पीएफआयचे राष्ट्रीय मुख्य सचिव ए. के. अश्रफ, मोहिद्दीन हळेयंगडी अणि नवाझ या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. डी. जे. हळ्ळी आणि के. जे. हळ्ळी येथील हिंसाचार प्रकरणात या तिघांचा सहभाग असल्याचा संशय आहे. येथील प्रेजर टाऊन येथील कार्यालयावर छापा टाकून झडती घेण्यात आली.

दहशतवादी संघटनांना कुमक देणाऱया संघटनांवर बंदी

दहशतवादी संघटनांना कुमक देणाऱया पीएफआय आणि एसडीपीआय संघटनांच्या कारस्थानांना पायबंद घालण्याची प्रक्रिया केंद्र पातळीवर सुरू झाली आहे. या दोन संघटनांनी केवळ राज्यातच नव्हे; तर देशभरात दहशतवादी संघटनांशी संपर्क ठेवल्याचे उघडकीस आली आहे. एनआयए कारवाई करताना जात, धर्म यांचा विचार करत नाही.

– अरग ज्ञानेंद्र, गृहमंत्री कर्नाटक

Related Stories

मशिदींवरील लाऊडस्पीकर रात्री १० ते सकाळी ६ बंद ; कर्नाटक वक्फ बोर्डाचा निर्णय

Abhijeet Shinde

कर्नाटक हायकोर्टाचा अभिनेत्री कंगनाला मोठा झटका

Abhijeet Shinde

कर्नाटक: मुख्यमंत्री संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करतील

Abhijeet Shinde

राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय चर्चेनंतर : मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

कर्नाटकात पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट

Abhijeet Shinde

कर्नाटक सरकारकडून १,२५० कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!