ऑनलाईन टीम / मुंबई
जुलै महिन्यात अतीवृष्टीने हाहाकार उडवून दिलेल्या वरुणराजाने काही दिवसापासून मोठी विश्रांती घेतली आहे. या दडी मारुन बसलेल्या पावसाचं राज्यात उद्यापासून पुन्हा जोरदार आगमन होणार आहे. भारतीय हवामान खात्यानं पावसाच्या आगमनाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुढील चार दिवस मान्सूनच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याचा पश्चिम व मध्य भारत क्षेत्रातून प्रवासाच्या शक्यतेमुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ३० ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असून परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह कोकण पट्टा आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या सरी बसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


previous post