Tarun Bharat

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही : मंत्री सुधाकर

बेंगळूर : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगात वाढल्याने बेंगळूरसह अनेक शहरातील रुग्णालयात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची चर्चा आहे. बऱयाच रुग्णालयातील रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित आहेत. रविवारी दिल्ली आणि महाराष्ट्रातील सरकारने ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची तक्रार केली आहे. मात्र, राज्यातील जनता याबाबत भीती बाळगू नये. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा नाही, असे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी टविट्रद्वारे स्पष्ट केले आहेत.

कर्नाटकात 7 वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन केंद्रे आहेत. याठिकाणी दिवसाला 812 टन ऑक्सिजन उत्पादन करण्याची क्षमता आहे. तर शनिवारी 272.61 टन ऑक्सिजनचा वापर करण्यात आला आहे. असे असताना राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची अफवा पसरवत नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचे काम कोणीही करू नये, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

कर्नाटकमध्ये ५२९ नवीन बाधितांची नोंद

Archana Banage

‘मेहरूनिसा’ भारतीय चित्रपटसृष्टीत परिवर्तन घडवून आणेल

Archana Banage

विकेंड कर्फ्यू रद्द : नाईट कर्फ्यू कायम

Amit Kulkarni

कर्नाटकात कोरोनामुळे ४२ मुलांनी गमावले दोन्ही पालक

Archana Banage

राज्यातील सर्व जिल्हय़ांमध्ये ऑक्सिजन बससेवेचा विस्तार करणार

Amit Kulkarni

पोटनिवडणूक प्रचाराची सांगता, उद्या मतदान

Patil_p