Tarun Bharat

राज्यात कोरोनामुळे 28 डॉक्टरांचा मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोनाकाळात रुग्णांवर उपचार करणाऱया अनेक डॉक्टरांचाही मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 500 हून अधिक डॉक्टर दगावले असून कर्नाटकात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱया 28 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी राज्यात कोरोनाकाळात 9 डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्यावर लगेचच आयएमएने हा आकडा चुकीचा असून, त्याच्या तिप्पट जणांचा म्हणजेच 28 डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात डॉ. के. सुधाकर यांनी ट्विट करून देशात कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱया 646 डॉक्टरांचा मृत्यू झाला असून कर्नाटकातील डॉक्टरांचा मृत्यू दर हा कमी आहे. 9 डॉक्टरांचा मृत्यू झाला असे स्पष्ट केले होते. त्यावर आक्षेप घेत, आयएमएने कोरोनाकाळात 91 डॉक्टर दगावले असून पहिल्या लाटेत 63 व दुसऱया लाटेत 28 डॉक्टरांचा कोरोनाबाधितांवर उपचार करताना मृत्यू झाला, असे स्पष्ट केले.

28 डॉक्टर आम्ही गमावले असले तरी एकाही डॉक्टरला प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत साहाय्यधन मिळालेले नाही. पहिल्या लाटेत मृत्यू झालेल्या 63 डॉक्टरांच्या कुटुंबीयांनाही नुकसानभरपाई मिळालेली नाही, असे आयएमए कर्नाटकचे अध्यक्ष डॉ. एम. वेंकटाचलपती यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

रेल्वे सुरू होताच प्रवाशांच्या संख्येत वाढ

Amit Kulkarni

अनगोळच्या दोन भाविकांवर काळाचा घाला

Amit Kulkarni

शहापूर येथे जुगारी अड्डय़ावर छापा

Patil_p

शहर परिसरातील मंदिरांतून भक्तांची वर्दळ

Patil_p

शिवाजी महाराजांची मूर्ती शिमोग्याला रवाना

Amit Kulkarni

असे तपासा आपले विजेचे बिल

Patil_p
error: Content is protected !!