प्रतिनिधी / मुंबई
राज्यात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात झपाट्याने वाढत असून आज रुग्णांची हजारी पार केली आहे. आतापर्यंत राज्यात १ हजार १८ रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात १५० नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ही वाढती संख्या सरकारसाठी चिंतेचा विषय बनली आहे. तर मुंबईला कोरोनाचा विळखा पडत असून आज दिवसभरात ११६ रुग्ण वाढले आहेत.
राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत असून आज ११६ रुग्णांची भर पडल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा ६४२ वर गेलाय. तर पुणे १८, अहमदनगर ३, बुलढाणा २, ठाणे २, नागपूर ३, सातारा १, औरंगाबाद ३, रत्नागिरी १, सांगली १ अशाप्रकारे १५० रुग्ण आज नव्याने आढळून आले आहेत. आतापर्यंत राज्यात ६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


previous post