Tarun Bharat

राज्यात गेले सहा दिवस कोरोनावाढ सुरूच

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोनाची नवीन प्रकरणे पुन्हा वेगाने वाढत आहेत. गुरुवारी सलग सहाव्या दिवशी बाधितांच्या संख्येत वाढ झाली. गुरुवारी राज्यात १४०० हुन नवीन बाधितांची नोंद झाली. गेल्या वर्षी २५ डिसेंबरनंतर राज्यात पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या मोठ्या प्रकरणांची नोंद झाली आहे. दरम्यान गुरुवारी राज्यात १,४८८ नवीन बाधितांची नोंद झाली आहे. तर चार बाधितांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात उपचाराधीन रूग्णांची संख्याही वाढत आहे. गुरुवारी राज्यात ३४१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यासह राज्यात कोविडच्या सक्रिय रूग्णांची संख्या ११,३६३ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे एकूण १२,४११ लोक मरण पावले आहेत.

राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे. गुरुवारी जिल्ह्यात सर्वाधिक ९२५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर १४० रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत ४,५३७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

पिण्याचे पाणी, कृषी पंपसेटना सुरळीत वीजपुरवठा

Amit Kulkarni

ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नाही : उपमुख्यमंत्री

Archana Banage

कर्नाटक: आमदार एच. पी. मंजुनाथ कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

घातपाताचा कट : मंगळुरात 5 जणांना अटक

Amit Kulkarni

टिप्परची धडक बसून 54 बकऱ्या ठार

Tousif Mujawar

तामिळनाडूच्या धोरणाविरोधात मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

Amit Kulkarni