Tarun Bharat

राज्यात तिसऱ्या लाटेपूर्वी ७५ टक्के प्रौढांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न: उपमुख्यमंत्री

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण सुरु आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्गाचा वेग जास्त होता. त्यामुळे सरकारला तयारीला जास्त वेळ मिळाला नाही. आता कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एक पर्याय आहे. दरम्यान कोरोनाची दुसरी लाट कमी कमी होत असून संभाव्य तिसरी लाट येण्याआधी ७५ टक्के प्रौढांचे लसीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथ नारायण यांनी सांगितले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथ नारायण म्हणाले की लसीचा पुरवठा हळूहळू वाढेल. केंद्राकडून लस मिळेल त्याप्रमाणे लसीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, अधिकाधिक लोक लसीकरणात सहभाग घेत आहेत. लसीचा पुरवठा होईल त्याप्रमाणे तिसरी लाट येण्यापूर्वी ७५ टक्के प्रौढांना लस देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे, असे ते म्हणाले.

Related Stories

कर्नाटकात बुधवारी ७ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद

Archana Banage

कर्नाटकातही लव्ह जिहादाविरोधी कायदा येणार

Patil_p

“कर्नाटकात अ‍ॅम्फोटेरिसिन-बी औषधाची कमतरता”

Archana Banage

ऑपरेशन कमळ : येडियुराप्पांच्या चौकशीला संमती

Amit Kulkarni

2.28 लाख बीपीएल रेशनकार्डे तीन वर्षात रद्द

Amit Kulkarni

लोककलाकार मंजम्मा जोगती यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान

Abhijeet Khandekar