Tarun Bharat

राज्यात पावसाचे पुनरागमन

31 पर्यंत सौम्य, मध्यम प्रमाणात शक्यता

प्रतिनिधी /पणजी

राज्यात पावसाचे पुनरागमन झाले असून पुढील दोन-तीन दिवसात सर्वत्र जोरदार पावसाची शक्मयता आहे. हवामान खात्याने दि. 31 पर्यंत राज्यात सौम्य तथा मध्यम प्रमाणात पावसाची शक्मयता व्यक्त केली आहे. गेले काही दिवस दडी मारल्यानंतर पावसाचे गोव्यात पुनरागमन झाले आहे.

 पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे शेतकरीवर्गात विशेषतः छोटय़ा भाजीपाला आणि फळभाज्याची लागवड करणाऱया शेतकऱयांना या पावसामुळे दिलासा मिळाला. शुक्रवारी सकाळपासून पणजीत जोरदार पावसाला प्रारंभ झाला गुरुवारी रात्री पणजी व आसपासच्या भागात सर्वत्र सौम्य तथा मध्यम प्रमाणात पाऊस झाला. गोव्यातील पेडणे व अन्य काही भागात सर्वत्र पाऊस झाला. दुपारपासून राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली.

 प्राप्त माहितीनुसार अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा याचा परिणाम संपूर्ण गोव्यासह इतर भागात झाला आहे. त्याचबरोबर आता ओरिसामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्र गोवा तसेच मध्य प्रदेशमध्ये देखील सर्वत्र जोरदार तथा मध्यम प्रमाणात पावसाची शक्मयता व्यक्त झाली आहे. आज शनिवारी राज्यात सर्वत्र मध्यम तथा हलक्मया प्रमाणात तर काही भागात जोरदार पाऊस पडणार असा अंदाज आहे. दि. 31 ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वत्र पावसाळी वातावरण राहणार आहे.

Related Stories

पंचायत निवडणुका 12 सप्टेंबरनंतर घेण्याची परवानगी द्यावी : राज्य सरकार

Amit Kulkarni

मडगावात ‘बीग जी’ वर धाड, अवैध मद्य जप्त

Amit Kulkarni

काणकोण पालिकेकडून मान्सूनपूर्व कामांना प्रारंभ

Omkar B

दुचाक्या चोरणारा जेरबंदः 6.5 लाखांच्या दुचाक्या जप्त

Amit Kulkarni

काजू, नारळ फेणी आता वारसा पेय

Amit Kulkarni

सात मतदारसंघात दोन दिवस मर्यादित पाणीपुरवठा

Amit Kulkarni