Tarun Bharat

राज्यात पेट्रोलचे दर कमी करण्याचा प्रस्ताव नाही: मुख्यमंत्री बोम्माई

बेंगळूर /प्रतिनिधी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी सांगितले की, शेजारच्या तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात पेट्रोलचे दर कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारपुढे नसल्याचे म्हंटले आहे. त्यांनी ” पेट्रोलचे दर कमी करण्याचा तसा कोणताही प्रस्ताव नाही,” असे बोम्माई यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी तामिळनाडूप्रमाणे पेट्रोलच्या किंमती कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे ते म्हणाले.

तामिळनाडूचे अर्थमंत्री पालिनिवेल ठियागा राजन यांनी शुक्रवारी विधानसभेत आपला पहिला अर्थसंकल्प सादर करताना म्हटले होते की, सरकारने पेट्रोलवरील कर प्रति लिटर ३ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर काँग्रेसचे नेते आणि कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री बोम्माई यांना राज्यात पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या किंमती कमी करण्याची विनंती केली होती.

Related Stories

कर्नाटक: कथित आत्महत्या प्रकरणाची चौकशी व्हावी

Archana Banage

कशी आहे नारायण राणेंची शस्त्रक्रियेनंतर तब्येत; पाहूया डॉक्टर काय म्हणाले…

Kalyani Amanagi

शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन

Tousif Mujawar

”छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं”

Archana Banage

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनची कबर सजवली

Archana Banage

धक्कादायक : वाशिममध्ये 229 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग

Tousif Mujawar