Tarun Bharat

राज्यात बाधितांच्या संख्येत वाढ सुरूच

बेंगळूर/प्रतिनिधी

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पहायला मिळत आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम सुरु झाली आहे.

दरम्यान कर्नाटकातही बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सोमवारी राज्यात पुन्हा कोरोनाने ९०० चा टप्पा ओलांडला. राज्यात सोमवारी कोरोनाचे ९३२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तर राज्यातील विविध जिल्ह्यातून सर्वाधिक ४२९ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णायातून घरी परतले. तर ७ कोरोना संक्रमित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ८,८६० इतकी आहे. तर राज्यात आतापर्यंत १२,३९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्याही बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. तसेच सध्या उपचारात असणारे सर्वाधिक रुग्णही बेंगळूरमध्येच आहेत. दरम्यान सोमवारी जिल्ह्यात सर्वाधिक ५५० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर १९८ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या देखील ६,४५४ वर पोहोचली आहे. दरम्यान शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,५२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

‘बेंगळूर टेक समिट’चे आयोजन नोव्हेंबरमध्ये

Amit Kulkarni

दिलासादायक: कर्नाटकात ८८ टक्क्याहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

Archana Banage

म्हैसूर : रेमडेसिवीरचा काळाबाजार; ५ जणांना अटक

Archana Banage

पदवी महाविद्यालये 17 नोव्हेंबरपासून सुरू होणार

Patil_p

वादग्रस्त सीडीचे प्रसारण नको!

Amit Kulkarni

बेंगळूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी परीक्षेला प्रारंभ

Archana Banage