Tarun Bharat

राज्यात मुख्यमंत्री बदलले काय? चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांना सवाल

कोल्हापूर/प्रतिनिधी

राज्यात मुख्यमंत्री बदलले काय? घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायची असते. मात्र शरद पवार कसे काय घोषणा करतात. उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली पाहिजे. अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आज ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेवेळी बोलत होते. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, एसटी कर्मचारी का आंदोलन करत आहेत याची जाणीव राज्य
सरकारला असायला हवी. एन सणासुदीला अडीच हजार रुपये बोनस एसटी कर्मचाऱ्यांना परवडणार का असा सवाल पाटील यांनी करत एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासह रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला.

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोनात महाविकास आघाडी सरकारने जनतेला आवळा दिला. सगळा निधी केंद्राने दिला. यांनी एक मास्कही देखील विकत घेतला नाही. केवळ चेक हातात घेऊन फिरत होते. असा टोला पाटील यांनी लगावला.

केंद्राने इंधनदर कपातीबद्दल घेतलेल्या निर्णयाबद्दल आणि राज्यातील इंधन कपातीविषयी बोलताना पाटील म्हणाले, इंधनाबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार असेल तर आम्ही स्वागत करू. आम्ही कपटे नाही. पण माझं चॅलेंज आहे हे सरकार इंधनाचे दर कमी करणार नाही. असे देखील पाटील म्हणाले.

पुढे बोलताना आमदार पाटील यांनी, संजय राऊत यांनी काय म्हणायचं हा त्यांचा निर्णय आहे. पोट निवडणुकीत एकूण जागा जास्त भाजपनं जिंकल्या. राऊत हे दुर्बीण घेऊन बसले आहेत. कुठं छिद्र आहे हे बरोबर शोधतात. संपूर्ण पोशाख ते बघत नाहीत. डेलकर यांचा विजय हा शिवसेनेचा विजय म्हणायचा का? कारण डेलकर वेगवेगळ्या चिन्हांवर सात वेळा निवडून आले आहेत. असा खोचक टोला ही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

पेट्रोल आणि डिझेलचे दर आता राज्याने कमी केले पाहिजे.14 राज्यांनी देखील दर कमी केल. 2024 ला काय करायचे ते जनता ठरवेल. शंभूराज देसाई यांनी त्यांचे बघावे, असे पाटील म्हणाले.

Related Stories

नाशिकमध्ये अपघातानंतर खासगी बस पेटली, 12 जणांचा होरपळून मृत्यू

datta jadhav

एमपीएससीच्या संधीवर मर्यादा घालणे अन्यायकारक : चंद्रकांत पाटील

Archana Banage

आतंरराष्ट्रीय करप्रणाली परीक्षेत उचगावचा रजत पोवार भारतात पहिला

Archana Banage

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. दिगंबर शिर्के यांची नियुक्ती

Archana Banage

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन; शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष : राजू शेट्टी

Abhijeet Khandekar

महापुरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी विकास समिती मैदानात

Archana Banage