Tarun Bharat

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा : सिद्धरामय्या

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकातील ज्येष्ठ मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर राज्यपाल वजुभाई वाला यांना लिहिलेल्या पत्रात गंभीर आरोप केल्याच्या एक दिवसानंतर, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.

दम्यान ज्येष्ठ मंत्री ईश्वरप्पा यांनी केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. राज्यपालांनी यामध्ये हस्तक्षेप करावा, सरकार बरखास्त करावे आणि राष्ट्रपती राजवटीची (कर्नाटकात) शिफारस करावी, ”असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.

सिद्धरामय्या यांनी पाच पानांच्या पत्राला राज्यात “भाजपाच्या भ्रष्टाचार, नातलगवाद आणि अनियमिततेचे पुरावे” असे संबोधले. आजपर्यंत आम्ही हे बोलत होतो. आता त्यांच्याच पक्षाचे मंत्री बोलत आहेत. त्यामुळे याची दखल घेत राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करावी अशी मागणी केली आहे.

Related Stories

गॅस टँकरची कारला धडक, ६ जखमी

Archana Banage

एअरो इंडिया शो-2021 ला प्रारंभ

Patil_p

बारावी निकाल प्रसिद्धीला स्थगिती

Amit Kulkarni

अग्निपथला शेतकरी व कामगार संघटनांचा विरोध

Tousif Mujawar

…नंतरच कोरोना कर्फ्यू कालावधी वाढीचा निर्णय घेणार : बोम्माई

Amit Kulkarni

कर्नाटकला दररोज ५ लाख लसीचे डोस देण्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे आश्वासन

Archana Banage