Tarun Bharat

राज्यात शंभर पोलिसांना कोरोना,दोघांचा मृत्यू तरीही १२ तास ड्यूटी

प्रतिनिधी / कोल्हापूर

जगभरामध्ये कोरोनाची झपाट्याने फैलावत असताना पोलिसांना मात्र धोका वाढत आहे. राज्यात शंभर पोलीसांना कोरोना तर दोघांचा मृत्यू झाला आहे. तत्पूर्वीच पोलिसांच्या सुरक्षेसाठी आठ तासांची ड्युटी करण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी पोलीसांना १२ तासांची ड्यूटी केल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. कोरोना सारख्या महाभयंकर विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. प्रत्येकाच्या मनात भितीचे वातावरण आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी देशभरात संचारबंदी लागू केली आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर, पोलीस हे घटक प्राधान्याने कोरोना योध्ये म्हणून जीवावर उदार होवून कार्यरत आहेत. ते ही माणसेच आहेत त्यांनाही कुटुंब आहे अशा या घटकाला या महामारीच्या काळात थोडासा दिलासा देणारा निर्णय पोलीस दलाने घेतला होता पोलिसांची ड्युटी १२ तासावरून ८ तास करण्यात आली. यामुळे हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना या महामार्गाच्या फळात काम करण्याचे बळ मिळाले.

असे असले तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात मात्र पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशाला हरताळ फासण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वच पोलिसांना आज तासांची ड्युटी असताना हेच पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना मात्र बारा तासांची नोकरी अनिवार्य करण्यात आली आहे कोरणाचे संकट डोक्यावर घोंगावत असल्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अडचणीमध्ये आणि वाढ झाली आहे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी याकडे गांभीर्याने पाहून पोलीस कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.सीपीआरमधील पोलीसांना धोका अधिक आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह बाहेरून आलेल्या सर्वच प्रवाशांवर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयांमध्ये कोरोनाची तपासणी केली जाते. याठिकाणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे. वारंवार या कक्षाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनाही कोरोना होण्याचा धोका वाढला आहे. तसेच नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांना दर दोन तासांनी कोरोना कक्षामध्ये जावून रुग्णांविषयी माहिती घ्यावी लागते. ही माहिती वैद्यकीय कर्मचाऱ्यांनीच पोलीसांकडे पोहोच करावी अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांतून होत आहे.

Related Stories

राऊतांचा कोठडीतला मुक्काम वाढला

datta jadhav

कुख्यात गुंडांची पोलीसांसोबत झटापट

Archana Banage

चिनी वस्तूवरील बहिष्कारामुळे ‘स्वदेशी’ला ‘अच्छे दिन ‘

Kalyani Amanagi

रत्नागिरीत २४ तासात ४६ नवे रुग्ण

Archana Banage

अनर्थ टळला, मालगाडीचं इंजिन रुळावरुन घसरुन थेट घुसलं शेतात

Archana Banage

सातारा : वडुथ येथे युवकाचा पाय तोडून खून

Archana Banage