Tarun Bharat

राज्यात शनिवारी ६,९५५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात कोरोनाचा वेग वाढतच आहे. राज्यात शनिवारी ६,९५५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. राज्यात गेल्या चोवीस तासांत ३६ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात वाढत्या सांख्येबरोबरच मृतांची संख्याही वाढत वाचली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात शनिवारी ६,९५५ बाधित रुग्णांची भर पडली. तर ३,३५० रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. शनिवारी राज्यात सकारात्मकता दर ७.०४ टक्के होता.

दरम्यान राज्यात सक्रिय रूग्णांची संख्या वाढून ६१,६५३ झाली आहे. शनिवारपर्यंत राज्यात कोविडमुळे एकूण १२,८४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाची सर्वाधिक नवीन प्रकरणे आढळत आहेत. शनिवारी जिल्ह्यात नवीन प्रकरणांची संख्या ४,३८४ होती. तर २०२७ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परत आले. दरम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यात शनिवारी १९ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ४,७८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

राज्यातील 1054 केंद्रांवर एफडीएची परीक्षा सुरळीत

Amit Kulkarni

विविध जिल्हय़ांमध्ये संततधार सुरूच

Amit Kulkarni

बेंगळूर: बीएमटीसी एसएसएलसी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना देणार विनामूल्य बस सेवा

Archana Banage

माजी खासदार, शिक्षणतज्ञ प्रा. सेल्विदास यांचे निधन

Amit Kulkarni

राज्यात लॉकडाऊन की नाईट कर्फ्यू?

Patil_p

मंगळूर रेल्वे स्थानकात ऑक्सिजन केंद्र सुरू

Archana Banage