Tarun Bharat

राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाखाहून अधिक

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात कोरोनाचा दररोज नवा विक्रम होत आहे. शनिवारी कर्नाटकमध्ये कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाखाच्यावर गेली. दरम्यान राज्यात सध्या ४,०५,०६८ रुग्ण उपचारात आहेत. शनिवारी राज्यात ४०,९९० पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तसेच शनिवारी विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २७१ रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात १८,४३१ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. शनिवारपर्यंत राज्यात कोविडमुळे एकूण १५,७९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सकारात्मकतेचा दर २३.०३ टक्के होता.

राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बेंगळूर शहरी जिल्ह्यात शनिवारी १९,३५३ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७,२५६ रुग्ण कोरोनावर विजय मिळवून रुग्णालयातून घरी परतले आहेत. २४ तासात जिल्ह्यात १६२ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

कर्नाटक : वापरलेले मास्क, ग्लोव्हज विल्हेवाट बाबत न्यायालयाने मागितले स्पष्टीकरण

Archana Banage

दक्षिण बेंगळूर येथे होणार दररोज ७ तास कोरोना चाचणीः बीबीएमपी

Archana Banage

कर्नाटकात मंगळवारी कोरोना रुग्णांचा उच्चांक

Archana Banage

कर्नाटक: मंत्री एस.टी. सोमशेकर कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

बनावट स्टँपची विक्री करणारी टोळी गजाआड : 2.71 कोटीचा ऐवज जप्त

Patil_p

कर्नाटकातील ११ जिल्ह्यात २१ जूनपर्यंत लॉकडाऊन

Archana Banage