Tarun Bharat

‘राज्यात सोमवारपासून शाळा पुन्हा सुरु होणार’

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राज्यात सोमवारपासून पुन्हा शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. दरम्यान, काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत होता. कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेमध्ये ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूचे संकटदेखील उभे टाकले आहे. मात्र सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यामुळे दिलासा व्यक्त केला जातोय. कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे आता राज्य सरकारने 20 दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून शाळा, महाविद्यालये सुरु होणार आहे.

Related Stories

‘ही’ महिला चक्क कानाने पकडते छत्री..!

Rohit Salunke

खंडणी प्रकरणातील ‘त्या’ दोघांना जामीन

Archana Banage

बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; सुनावणी लांबली

Abhijeet Khandekar

राणेंच्या अडचणी वाढणार; एसीबीने दिले चौकशीचे आदेश

datta jadhav

पुणे विभागातील 1 लाख 27 हजार 529 रुग्ण कोरोनामुक्त

Tousif Mujawar

सातारा : कोयना खोऱ्यात भूकंपाचा धक्का

Archana Banage