Tarun Bharat

राज्यात 102 पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू, सरकारने सोडले वाऱ्यावर

Advertisements

प्रतिनिधी/मुंबई

महाराष्ट्रात ऑगस्ट 2020 ते एप्रिल 2021 या नऊ महिन्याच्या काळात तब्बल 102 पत्रकारांचे मृत्यू झाले असून 1500 पेक्षा जास्त पत्रकार कोरोनानं बाधित झाले आहेत. दुसऱ्या लाटेत हा मृत्यूदर चिंता वाटावी एवढा वाढला. 1 एप्रिल ते 18 एप्रिल या 18 दिवसात राज्यात तब्बल 31 पत्रकारांचे मृत्यू झाले आहेत. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख यांनी एका प्रसिध्द पत्रकाव्दारे ही माहिती दिली.

मराठी पत्रकार परिषदेने 1 ऑगस्ट 2020 पासून पत्रकारांबददलची माहिती संकलित केली आहे. ऑगस्ट 2020 ते 15 फेब़ुवारी 2021 या साडेसहा महिन्याच्या काळात जवळपास पन्नास पत्रकारांचे कोरोनाने निधन झाले. मात्र फेब्रुवारी नंतर आलेल्या दुसरया लाटेत बाधित पत्रकारांची संख्या जशी वाढली तद्वतच मृत्यूचे प्रमाण देखील वाढले. उपलब्ध आकडेवारीनुसार 16 फेब्रुवारी 2021 ते 17 एप्रिल 2021 या दोन महिन्यात तब्बल 56 पत्रकारांचे मृत्यू झाले. त्यातही 1 एप्रिल ते 18 एप्रिल या 18 दिवसात राज्यात तब्बल 30 पत्रकारांचे निधन झाले आणि दोन पत्रकारांनी आत्महत्या केल्या. राहुरीतील एका पत्रकाराची याच कालावधीत हत्या देखील झाली.

तरूण पत्रकारांची संख्या जास्त

पहिल्या लाटेत ज्या पत्रकारांचे मृत्यू झाले त्यातील बहुसंख्य पत्रकार 55 ते 65 या वयोगटातील होते. मात्र दुसरया लाटेत मृत्युमुखी पडलेले बहुसंख्य पत्रकार 35 ते 50 वयोगटातील आहे.. काल मृत्युमुखी पडलेल्या नागपूरच्या अंकित डा चं वय केवळ 31 वर्षांचं होतं.. बाधित होणारया पत्रकारांमध्ये देखील तरूण पत्रकार अधिक असल्याने सर्व वयोगटातील पत्रकारांना लस द्यावी यासाठी मराठी पत्रकार परिषदेने इ-मेल पाठवा आंदोलन केले होते मात्र उध्दव ठाकरे यांना या आंदोलनाची दखल घ्यावी असे वाटले नाही.. कामासाठी तरूण पत्रकारांना सतत बाहेर भटकावे लागते, लोकांना भेटावे लागते त्यामुळे त्यांना इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते..आणि म्हणूनच या वयोगटातील पत्रकारांना प्राधांन्याने लस द्यावी असा मराठी पत्रकार परिषदेचा आग्रह आहे.

दोन पत्रकारांच्या आत्महत्या

कोरोनामुळे अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे पत्रकार आर्थिक विवंचनेत अडकले. त्यातच जे पत्रकार किंवा त्यांचे कुटुंबिय बाधित झाले त्यांच्या दुख:ला सीमा राहिली नाही.. सोलापूरचे तरूण पत्रकार प्रकाश जाधव यांचे वडिल कोरोनानं गेले, आई आणि भाऊ पॉझिटिव्ह, स्वतःघरीच क्वारंटाइन अशा स्थितीत आर्थिक चणचण आणि औषधंही मिळत नसल्याने या सर्व त्रासाला कंटाळून प्रकाश जाधव यांनी आत्महत्या केली. परभणीचे अरूण हिस्वणकर हे देखील आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.. या दोन्ही घटना माध्यमातील अस्वस्थतः दरशविणाऱ्या आहेत.

सरकारचे पत्रकारांकडे दुर्लक्ष

मयत पत्रकारांच्या नातेवाईकांना 50 लाख रूपयांची मदत करण्याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेली घोषणा हवेतच विरली.. 50 लाख राहू द्या, केद़ाच्या धर्तीवर किमान 5 लाख रूपये तरी द्या या मागणीवर ही मुख्यमंत्री मौन घरून आहेत.. सर्व वयोगटातील पत्रकारांना लस द्या, पत्रकारांसाठी एक बेड राखीव ठेवा या आवश्यक मागण्यांकडे देखील सरकार दुर्लक्ष करीत असल्याने पत्रकारांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप एस.एम.देशमुख यांनी केला आहे..

Related Stories

धोका वाढला! नाशिकमध्ये आढळले ‘डेल्टा’चे 30 रुग्ण

Tousif Mujawar

“महाराष्ट्रात अक्षय कुमार आणि अमिताभ यांचे सिनेमे, चित्रीकरण बंद पाडू” ; नाना पटोले

Archana Banage

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून सुरु

Archana Banage

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांनी ओलांडला 20 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

महावितरणची ‘मिशन ऑक्सिजन’ मोहीम युद्धपातळीवर

Tousif Mujawar

राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा; पहिलं बक्षीस ५० लाख

Archana Banage
error: Content is protected !!