Tarun Bharat

राज्यात 161 नवे रुग्ण : 164 जणांना डिस्चार्ज

मंगळवारी दोघांचा बळी : राज्यातील रुग्णसंख्या 6 हजारासमीप

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचे प्रमाण मागील दोन दिवसांपासून कमी आहे. तथापि, मंगळवारी दोघांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तर 161 नवे रुग्ण आढळले आहेत. हा आकडा मागील दोन आठवडय़ांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. दुसरीकडे संसर्गमुक्त होणाऱयांचा आकडा समाधानकारक आहे. मागील 24 तासांमध्ये 164 जण संसर्गमुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत 5,921 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 2,605 जण बरे झाले आहेत. त्यामुळे सध्या सक्रीय रुग्णांची संख्या 3,248 इतकी आहे. तर बळींची संख्या 66 वर पोहोचली आहे. परराज्यातून कर्नाटकात येणाऱयांमुळे रुग्णसंख्येत मोठी भर पडली आहे. परराज्यातून आणि परदेशातून कर्नाटकात येणाऱयांचा ओघ कमी झाला आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात येण्यासाठी आणखी काही आठवडय़ांचा कालावधी लागू शकतो.

मंगळवारी यादगिरमध्ये सर्वाधिक 61, बेंगळूर शहर जिल्हय़ात 29, मंगळूरमध्ये 23, गुलबर्गा 10, बिदर 9, दावणगेरे 8, कोप्पळ 6, शिमोगा 4, विजापूर, म्हैसूर, धारवाड व चिक्कबळ्ळापूर जिल्हय़ातील प्रत्येकी 2 तसेच बागलकोट तुमकूर व चामराजनगरमध्ये प्रत्येकी 1 नवा रुग्ण आढळला आहे. दिवसभरात पॉझिटिव्ह आढळलेल्या 161 रुग्णांपैकी 91 जण परराज्यातून तर 24 जण परदेशातून आलेले आहेत.

बेंगळूर, यादगिरमध्ये कोरोनाचे बळी

बेंगळूर शहर जिल्हय़ात 65 वर्षीय पुरुष तापामुळे 3 जून रोजी व्हिक्टोरिया इस्पितळात दाखल झाला होता. त्याला कोरोनाची लागण झाली होती. शिवाय त्याला मधुमेह, मूत्रपिंड विकार होता. सोमवारी रात्री त्याचा उपचारादरम्यान मत्यू झाला होता. गुलबर्गा जिल्हय़ात 17 वर्षीय कोरोनाबाधित युवती देखील कोरोनाची बळी ठरली आहे. तिला 4 जून रोजी ताप, डोकेदुखी, श्वसनाच्या त्रासामुळे इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला होता. मंगळवारी तिच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Related Stories

विकेंड कर्फ्यू काळात बससेवा सुरू राहणार

Amit Kulkarni

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये तेजी

Patil_p

हिडकल जलाशयात 45 टीएमसी पाणीसाठा

Amit Kulkarni

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील बेळगुंदी फाटय़ाजवळ ट्रक पलटी

Amit Kulkarni

शिवसागर साखर कारखान्याच्या कामगारांचे आंदोलन

Amit Kulkarni

मी भारताचा पंतप्रधान असतो तर…

Patil_p