Tarun Bharat

राज्यात 24 तासात कोरोनाचे चार बळी

मृत विजापूर, बेंगळूर, गुलबर्ग्यातील : बळींची संख्या 10 वर

प्रतिनिधी/ बेंगळूर

मागील 24 तासात कोरोनामुळे चौघांचा बळी गेला आहे. यामध्ये बेंगळूरमधील दोघांचा तर विजापूर आणि बागलकोटमधील एकाचा समावेश आहे. तर 13 नवे रुग्ण आढळले असून कोरोना संसर्गबाधितांची संख्या 260 वर पोहोचली आहे. त्यापैकी 71 जण आता बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी सायंकाळपासून मंगळवारी सायंकाळपर्यंत राज्यात 13 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यात बेंगळूर शहर, बागलकोट आणि गुलबर्गा जिल्हय़ात प्रत्येकी 3, विजापूर, बेळगाव, कारवार (भटकळ), चिक्कबळ्ळापूरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. विजापूर जिल्हय़ातील 69 वर्षीय वृद्धाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. त्याला त्याच्या 60 वर्षीय पत्नीमुळे कोरोनाची लागण झाली होती.

बेंगळूरमध्ये तीन नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून त्यापैकी 65 आणि 76 वर्षीय वृद्ध दगावले आहेत. त्यांना बेंगळूरच्या राजीव गांधी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्या दोघांचा सोमवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. शहरात कोरोनाग्रस्त आढळलेला 26 वर्षीय युवक 7 एप्रिल रोजी आपल्या पित्यासमवेत हिंदूपूर येथे दुचाकीवरून गेला होता. तर 35 वर्षीय महिलेला देखील संसर्ग झाला आहे.

गुलबर्ग्यात 55 वर्षीय इसम कोरोनाचा बळी ठरला आहे. त्याचप्रमाणे जिल्हय़ात 3 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 35 वर्षीय महिला व तिची 10 वर्षीय मुलगी आणि 51 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह ठरले आहेत. कारवार जिल्हय़ातील भटकळमध्ये 36 वर्षीय महिलेला तिच्या पतीमुळे संसर्ग झाला आहे. या जिल्हय़ातील रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे. चिक्कबळ्ळापूरमध्ये 65 वर्षीय व्यक्तीला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. तो कोणाच्या संपर्कात होता, हे अद्याप समजलेले नाही.

बागलकोटमध्ये 12 जण कोरोनाचे रुग्ण

बागलकोटमध्ये मागील 24 तासात कोरोनाबाधित 3 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील रुग्णसंख्या 12 झाली आहे. जिल्हय़ात 3 एप्रिल रोजी आढळून आलेल्या 75 वर्षीय कोरोनाग्रस्त वृद्धामुळे आतापर्यंत पाच जणांना संसर्ग झाला आहे. त्याच्यामुळे मंगळवारी शेजारच्या कुटुंबातील 39 वर्षीय महिलेला  कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 43 वर्षीय पुरुष आणि 32 वर्षीय महिला हे देखील कोरोनाचे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना त्यांचा 4 वर्षीय मुलगा आणि शेजारील महिलेच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाची बाधा झाला आहे.

Related Stories

हुतात्म्यांचे बलिदान वाया जाणार नाही

Amit Kulkarni

नार्वेकर गल्लीत दूषित पाण्याचा पुरवठा

Amit Kulkarni

शेतकऱयांचा 24 रोजी हेस्कॉमवर मोर्चा

Amit Kulkarni

मनपा उपायुक्तांकडून उशिरा येणाऱया कर्मचाऱयांची हजेरी

Omkar B

पुन्हा निवडणुका घेऊन मुख्यमंत्र्यांनी उदार वृत्ती सिद्ध करावी

Amit Kulkarni

तरुण भारत निपाणी कार्यालयाचा आज वर्धापन दिन

Amit Kulkarni