Tarun Bharat

राज्यात 299 रुग्णांची भर

Advertisements

एकूण कोरोना बाधितांची संख्या पोहोचली 3221 वर : दोघांचा मृत्यू : 221 जण कोरोनामुक्त

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून मागील 24 तासांत 299 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात कोरोनाने कहर केला असून एकूण रुग्णसंख्या 3221 वर पोहोचली आहे. रायचूरमध्ये 83, यादगिरीत 44, बिदरमध्ये 33, बेंगळूर शहरात 21, गुलबर्गा जिल्हय़ात 28, विजापुरात 26, मंगळूरमध्ये 14, बेळगाव, मंडय़ा जिल्हय़ात प्रत्येकी 13, उडुपीमध्ये 10, दावनगेरेमध्ये 6, कारवार जिल्हय़ात 5, कोलार, शिमोगा, बळ्ळारीमध्ये प्रत्येकी एक कोरोनाबाधित आढळून आला आहे. तर एकाच दिवशी 221 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानुसार कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 1216 वर पोहोचली आहे. राज्यभरात कोरोनामुळे दोघांचा बळी गेला असून मृतांची संख्या 51 वर पोहोचली आहे. तर 1950 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आढळून आलेल्या बाधितांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातून परतलेले आहेत. परराज्यातून येऊन क्वारंटाईन झालेल्या नागरिकांचाच स्वॅब पॉझिटिव्ह येत आहे. कोरोनामुळे रविवारी दोघांचा बळी गेला आहे. मुंबईहून येऊन क्वारंटाईनमध्ये असलेल्या रायचूर जिल्हय़ातील 50 वर्षाच्या पुरुषाचा 29 मे रोजी मृत्यू झाला होता. रविवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर बिदर जिल्हय़ातील 75 वर्षीय पुरुष ताप आणि श्वसनाच्या त्रासाने इस्पितळात दाखल झाला होता. दरम्यान, 29 रोजी त्याचाही मृत्यू झाला असून रविवारी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Related Stories

विमा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक 74 टक्के

Patil_p

केरळ विधानसभेत अभिभाषणापूर्वी गोंधळ

Patil_p

मुंबईत पावसाचे 25 बळी

Patil_p

बंगालमध्ये घटनेची पायमल्ली – राज्यपाल

Patil_p

नव्या संसदभवनाच्या कोनशीला समारंभाला मान्यता

Patil_p

तामिळनाडूतील मच्छीमारांवर श्रीलंकन नौदलाचा हल्ला

datta jadhav
error: Content is protected !!