बेंगळूर : राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला असून सोमवारी दिवसभरात 5,279 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर मागील चोवीस तासांत 1,856 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, दिवसभरात 32 बाधितांचा बळी गेला आहे. रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढल्याने आरोग्य खात्याच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 42,483 वर पोहोचली आहे. आरोग्य खात्याच्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात आतापर्यंत 10,20,434 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 9,65,275 जण संसर्गमुक्त झाले तर 12,657 बाधितांचा मृत्यू झाला. गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात 97,829 कोविड चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण 5.39 टक्के इतके आहे.


previous post