Tarun Bharat

राज्यात 75 वा क्रांतिदिन साजरा

Advertisements

कोरोनामुळे मर्यादीत स्वरुपात आयोजन : जाहीर भाषणे, सत्कार, कार्यक्रमांना फाटा

प्रतिनिधी /पणजी

गोवा राज्याचा 75 वा क्रांतिदिन कार्यक्रम काल शुक्रवारी मर्यादित स्वरुपात  पणजीतील आझाद मैदानावर साजरा करण्यात आला. त्यावेळी जाहीर भाषणे, सत्कार यांना फाटा देण्यात आला. हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्रे वाहून श्रद्धांजली अर्पण करुन कार्यक्रम आटोपता घेण्यात आला.

राज्यपाल भगतसिंग कोशियारी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, पोलीस महानिरीक्षक मुकेशकुमार मिना, मुख्य सचिव परिमल राय अशा मोजक्याच जणांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम जनतेसाठी तसेच स्वातंत्र्यसैनिक, शालेय मुलांसाठी खुला नव्हता. कोरोनाचे संकट कायम असल्याने तो थोडक्यात आटोपण्यात आला.

विरोधकांना स्वार्थासाठी राजकीय क्रांती हवी : मुख्यमंत्री

कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, काही राजकीय पक्षांना व त्यांच्या नेत्यांना त्यांच्या स्वार्थासाठी राजकीय क्रांती व्हावी असे वाटते. गोवा फॉरवर्ड पक्षाने मांडलेला राजकीय क्रांतीचा प्रस्ताव म्हणजे केवळ ‘स्वार्थ’ आहे. ती राजकीय क्रांती गोव्यासाठी गरजेची नाही तर शिक्षण, विकास यांची क्रांती गोव्यात होणे महत्त्वाचे आहे.

स्वयंपूर्ण – आत्मनिर्भर गोव्यासाठी क्रांती व्हायला हवी. ती क्रांती होण्यासाठी सर्व पक्षीय आमदार, मंत्री, नेते यांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.

विकासाच्या आघाडीवर क्रांती निर्माण करायची आहे आणि गोव्याला पुढे न्यायचे आहे. त्यासाठी जनतेने हातभार लावावा असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. काही स्वार्थी राजकारण्यांना, राजकीय पक्षांना राज्यात क्रांती व्हावी, अशी इच्छा आहे. त्यासाठी ते धडपडत आहेत अशा शब्दात डॉ. सावंत यांनी विरोधी पक्षांवर टीका केली.

Related Stories

अर्थसंकल्पाचा गोव्याला मोठा लाभ

Amit Kulkarni

युरी आलेमाव यांचा गोवा फॉरवर्डला रामराम

Patil_p

सांखळी नगराध्यक्षपदी यशवंत माडकर

Omkar B

डॉ. आपोलोनियो लुईस निवर्तले

Amit Kulkarni

‘माझे घर, मालकी हक्क’

Amit Kulkarni

तरुणांनी सैन्यात भरती व्हावे

Patil_p
error: Content is protected !!