Tarun Bharat

राज्याला कोव्हॅक्सिनचे 1.25 लाख डोस उपलब्ध

प्रतिनिधी / बेंगळूर

राज्यात कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाच केंद्र सरकारने मंगळवारी कर्नाटकाला कोव्हॅक्सिनचे 1 लाख 25 हजार डोस वितरीत केले आहेत. आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. केंद्र सरकारकडून राज्याला आतापर्यंत कोव्हिशिल्डचे 12,91,280 डोस मिळाले आहेत. तर कोव्हॅक्सिनचे 1,44,170 डोस मिळाले आहेत. राज्याला सोमवारी केंद्राच्या कोटय़ातून कोव्हिशिल्डचे 3 लाख डोस उपलब्ध झाले होते. यापाठोपाठ मंगळवारी कोव्हॅक्सिनचा लससाठा मिळाला आहे.

Related Stories

कर्नाटक शनिवार-रविवार कर्फ्यूः गरज वाटल्यास केएसआरटीसी मर्यादित सेवा देणार

Archana Banage

कर्नाटक: राज्यभरात कोरोना फैलावासंदर्भात सर्वेक्षण होणार

Archana Banage

कर्नाटकमध्ये सोमवारी नवीन पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट, तर २४ मृत्यू

Archana Banage

चिक्कबळ्ळापूर : राष्ट्रीय महामार्ग ४४ वर झालेल्या अपघातात ४ जण ठार

Archana Banage

कर्नाटक : १ डिसेंबरपासून वैद्यकीय महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय

Archana Banage

मुख्यमंत्री बोम्माई यांना कोरोना

Amit Kulkarni