बेळगाव : शिमोगा येथे राज्य सरकारी नोकर संघ बेंगळूर येथे झालेल्या सरकारी कर्मचाऱयांच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयातील इंजिनिअरिंग उपविभागातील अधिकारी सुलेमान इमामसाब सनदी (बस्तवाड हलगा) यांनी 72 किलो वजनी गटात तिसरा क्रमांक पटकाविला. सनदी यांनी विरच्या एम बी दावणगिरी यांचा पराभव करुन तिसरा क्रमांक पटकाविला. त्याना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.


previous post