Tarun Bharat

राज्य परिवहन मंडळाच्या बसने ठोकरल्याने मोटार सायकलस्वार जागीच ठार

वार्ताहर/ जमखंडी

राज्य परिवहन मंडळाच्या बसने ठोकरल्याने मोटार सायकलस्वार जागीच ठार झाल्याची दुर्घटना जमखंडीतील मुधोळ रोडवर घडली. बसाप्पा शिवनिंगाप्पा धारणी (वय 42) रा. कडपट्टी ता. जमखंडी असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून बसाप्पा धारणी व मंजव्वा यल्लाप्पा मादर (वय 33) रा. यतनट्टी ता. बिळगी हे दोघे मोटार सायकलवरून जमखंडी तालुक्यातील कोण्णूरकडे निघले असता येथील मुधोळ रोडवर राज्य परिवाहनाच्या बसची ठोकर बसल्याने बसाप्पा धारणी जागीच ठार झाला. तर महिलेला किरकोळ दुखापत झाली. जमखंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात पीएसआय बसवराज अवटी यांनी घटनेची नोंद केली असून बस चालकाला ताब्यात घेवून अधिक चौकशी सुरु केली आहे.

Related Stories

लोको पायलटच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

Amit Kulkarni

मंडोळी रोडवरील पाणी गळती काढणार कोण ?

Amit Kulkarni

चोऱया, दरोडे अन् पोलिसांचे कागदी घोडे

Amit Kulkarni

लम्पिस्कीनमुळे मुतग्यातील 4 जनावरे दगावली

Amit Kulkarni

‘महाविद्यालये बंद’चे ‘व्हायरल’ परिपत्रक खेटे

Amit Kulkarni

धामणे दुर्गामाता दौडला उत्साहात प्रारंभ

Patil_p