Tarun Bharat

राज्य विधानसभेचे अधिवेशन आज

प्रतिनिधी/ पणजी

राज्य विधानसभेचे एक दिवशीय अधिवेशन आज मंगळवर 7 जानेवारी रोजी होत आहे. या वर्षातले हे पहिलेच अधिवेशन असल्याने राज्यपाल डॉ. सत्यपाल मलिक यांच्या अभिभाषणाने अधिवेशनास प्रारंभ होईल. भाजपने तसेच विरोधी पक्षांनीही आपापल्या सर्व आमदारांना व्हीप जारी केले आहेत.

 केंद्रीय विधेयकांच्या मान्यतेसाठी अधिवेशन

 संसदेत आणि विधानसभांमध्ये अनुसूचित जाती जमांतीना जागा आरक्षित करण्यासंदर्भात दर 10 वर्षानंतर कायद्याला पुढील 10 वर्षांसाठी मुदतवाढ देण्यासाठी तसेच अलिकडेच संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झालेल्या विधेयकाला कायद्यानुसार देशातील किमान 50 टक्के म्हणजेच 14 राज्यांनी मंजुरी देणे आवश्यक असल्याने सदर घटनेची तरतुद पूर्ण करण्यासाठीच हे विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. डॉ. सत्यपाल मलिक हे अलिकडेच गोव्याचे राज्यपाल बनल्याने आज विधानसभेत होणारे त्यांचे गोव्यातील पहिलेच अभिभाषण असेल.

केंद्र सरकारचे विधेयक सभागृहात संमत करून घेणे हा महत्त्वाचा विषय आहे. त्याशिवाय जीएसटी संदर्भातील एक महत्त्वाचे दुरूस्ती विधेयकही आज सभागृहात संमतीसाठी घेतले जाईल.

म्हादईप्रश्नी विरोधकांचा स्थगन प्रस्ताव

प्रथमच सारे विरोधी पक्षांचे आमदार एकत्र येत आहेत. 40 सदस्यीय विधानसभेत सत्ताधारी पक्षात भाजपचे 27, दोन अपक्ष आणि चर्चील आलेमाव मिळून 30 चे संख्याबळ आहे. विरोधी पक्षाकडे काँग्रेसचे 5, गोवा फॉरवर्डचे 3 मगो 1 व अपक्ष 1 मिळून 10 आमदार आहेत. सत्ताधारी पक्षाकडे भक्कम बहुमत असले तरी प्रथमच सभागृहात विरोधी पक्ष आक्रमक बनणार आहे. सभागृहात महादई प्रश्नी स्थगन प्रस्ताव आणून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्याचा विरोधी पक्षाचा इरादा आहे.

आज मंत्रिमंडळ बैठक

अधिवेशनाला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक स. 11 वाजता विधानसभा संकुलात बोलावली आहे. या बैठकीत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

चर्चिल कोणाच्या बाजूने?

राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव हे स्वत:च व्हीप आहे. ते गेली अडिज वर्षे भाजप सरकारचे समर्थन करीत आहेत. सध्या तर ते डॉ. प्रमोद सावंत यांचे गुणगान गातात. तथापि, त्यांच्या पक्ष व त्याचे नेते शरद पवार हे भाजपचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे चर्चिल आलेमाव यांची आज नेमकी कोणती भूमिका असेल याकडे विरोधीपक्ष पहात आहेत. विरोधी पक्षाच्या दक्षिण गोव्यातील एका हुशार आमदाराने चर्चिलच्या बाबतीत राष्ट्रवादी नेत्यांशी मुंबईत संपर्क साधलेला आहे. राष्ट्रवादीने आलेमाव यांना कोणते आदेश दिलेले आहेत ते समजू शकले नाही.

मला पक्षाने आदेश दिलेला नाही : चर्चिल

आमदार चर्चिल आलेमाव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. मी आणि माझा पक्ष निर्णय घेऊ. मला इतर कोणी नेत्यांनी काहीही सांगण्याची गरज नाही, असे मत त्यांनी गोवा फॉरवर्डचे नाव न घेता व्यक्त केले. आता सेक्युलर म्हणून ओरड मारणारे ज्यावेळी भाजपात होते तेव्हा सेक्युलरवाद कुठे गेला होता, असा सवालही आलेमाव यांनी केला. आपण प्रमोद सावंत सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सरकारच्या चांगल्या कामाना आणि डॉ. प्रमोद सावंत जे तळागाळातून वर आलेले आहेत त्यांना आपला पूर्ण पाठिंबा आहे, असे आलेमाव म्हणाले.

 

Related Stories

मंत्री माविन गुदिन्हो यांची चिखलीच्या हॉस्पिटलला पुन्हा भेट, घेतला साधनसुविधांचा आढावा

Omkar B

कारापूरच्या प्रभाग 2 मध्ये अजास खान विजयी.

Amit Kulkarni

उमेश तळवणेकर यांचा पेडणे मगो मंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा

Amit Kulkarni

काडतुसांच्या बॅगेमुळे पोलिसांची तारांबळ

Amit Kulkarni

‘फिल्म सिटी’साठी प्रयत्न होणे आवश्यक

Patil_p

विद्यार्थ्यांसाठी ‘कोडिंग व रोबोटिक्स’चा अभ्यासक्रमात समावेश

Amit Kulkarni