Tarun Bharat

राज्य शासनाने चांदी उद्योग चालू करण्यास सवलत द्यावी

वार्ताहर / हुपरी

हुपरी व परिसरातील चांदीपासून दागिने बनविण्याचा स्थानिक लघु हस्तकला उद्योग केंद्र व राज्य शासनाचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरू करण्यास सवलत मिळावी. आशा प्रकारचे निवेदन उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुबंई यांना चांदी कारखानदार असोसिएशन हुपरीच्या वतीने दिले असल्याची माहिती अध्यक्ष चंद्रशेखर नाईक व तज्ञ संचालक दिनकरराव ससे यांनी पत्रकार बैठकीच्या वेळी दिली. हुपरी व परिसरातील आठ ते दहा गावात पारंपारिक दृरष्ट्या घरोघरी चांदीचे दागिने बनविण्याचा लघु हस्तकला  उद्योग  आहे. या उद्योगावर दीड ते दोन लाख कारागिर नागरिक यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.

हा लघु उद्योग असल्याने किरकोळ प्रमाणात स्थानिक व शेजारील गावातील उद्योजकाकडे कमी प्रमाणात कारागीर असतात. त्यामुळे सोशल अंतराचा आम्ही पुर्णपणे वापर करून, आपण सांगितलेल्या नियमांचा उल्लंघन होणार नाही. याची आपणास खात्री देत आहे. छोटे छोटे उद्योजक वेगवेगळ्या ठिकाणी  आप – आपल्या घरात हा उद्योग करतात. प्रत्येक उद्योजकाकडे कमीत पाच कारागीर आणि जास्तीत जास्त पन्नास कारागिरांची संख्या असते. चांदीपासून दागिने बनविण्याचा उद्योग हुपरी, पट्टाकोडोली, इंगळी, तळंदगे, यळगुड, रेंदाळमधील काही भागात, कर्नाटक भागातील मांगुर, कोन्नूर, बारवाड, ढोनेवाडी, कारदगा या गावात चालतो. या सर्व गावात 3200 पर्यंत  छोटे मोठे चांदीचे उद्योग आहेत. या उद्योजकांचे कुटूंब, कारागिरांचे कुटुंब व इतर असे दोन ते अडीच लाख लोकांचा उदरनिर्वाह या उद्योगावर चालतो.

तरी या सर्व बाबींचा विचार करून चांदी लघु हस्तकला उद्योग सुरूकरण्यास सवलत द्यावी व आमचे उद्योग सामाजिक बांधिलकी जपत केंद्र, राज्य शासनाच्या व स्थानिक प्रशासनाच्या सर्व नियम, अटींचे काटेकोरपणे पालन करून उद्योग सुरू करीत आहोत. अशा प्रकारचे निवेदन मुख्यमंत्री ,गृहमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री,जिल्हाधिकारी यांना दिले आहे अशी माहिती यावेळी चांदी कारखानदार असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.

Related Stories

कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापना कडून पेठ वडगाव परिसरासाठी बोटीची सोय

Archana Banage

परिते येथील शेतकऱ्याचा गाईने फरफटत नेल्याने मृत्यू

Archana Banage

चालकांच्या बेफिकीरपणाचे नाहक बळी; अपघातांची मालिका सुरुच

Abhijeet Khandekar

Kolhapur : कळे- म्हासुर्ली मार्गावरील नवीन रस्त्याची खुदाई अपघातास निमंत्रण

Abhijeet Khandekar

पोटनिवडणुकीत गद्दारांचा बदला घ्या

datta jadhav

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार

Archana Banage