Tarun Bharat

राज्य सरकार झुकलं; छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणाला यश

राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची शिष्टाई; मागण्याबाबत दिले लेखी आश्वासन

कोल्हापूर, मुंबई / प्रतिनिधी

सारथीचे आर्थिक सक्षमीकरण, मराठा आरक्षण आंदोलनात मृत झालेल्या 18 तरुणांच्या कटुंबातील सदस्यांना नोकरी, मराठा आरणक्षातील आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासह इतर मागण्यासाठी शनिवारपासून (दि.26) मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण आंदोलन खासदार संभाजीराचे छत्रपती यांनी सुरू केले होते. ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज सायंकाळी भेट घेवून राज्य शासन प्रलंबित सर्व मागण्या मान्य करत असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेतले.

शिष्टमंडळातील मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागण्या मान्य झाल्याचं जाहीर केलं.मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्यानं आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेल्या खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करुन उपोषण मागे घेतल्यानंतर संभाजीराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. संभाजीराजे म्हणाले, आरक्षण हा दीर्घकालीन लढा आहे. सरकारपुढे ज्या मागण्या समोर ठेवल्या होत्या त्यातील काही मागण्या मान्य झाल्या याचा विशेष आनंद आहे. मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री वळसे पाटील, अमित देशमुख यांच्यासह इतर नेते इथे आले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. मागण्या मान्यकरुन मलासुद्धा वाचवलंत याबद्दलही आभार मानतो.

सरकारने मान्य केलेल्या मागण्या

1) सारथीचं व्हिजन डॉक्युमेंट 30 जून 2022he³e¥le तयार करणार

2) सारथीमधील रिक्त पदं मार्च 2022 पर्यंत भरली जाणार

3) आण्णासाहेब पाटील महामंडळाला अतिरिक्त 100 कोटींचा निधीची तरतूद

4) गुढीपाडव्याला मराठा समाजासाठी राज्यभरातील सर्व वसतीगृह सुरू करणार

5) मराठा आरक्षणासाठी गुन्हे दाखल झालेल्या तरुणांचे गुन्हे मागे घेण्याची तयारी

6) मराठा आंदोलनात मृत पावलेल्या नातेवाईकांना एसटी महामंडळात 18 जणांना नोकरी देण्यात आली आहे, इतरांनाही ताबडतोब नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

7) ज्यांचावर गुह्यांमध्ये सहभाग नव्हता त्यांच्यावरील देखील गुन्हे मागे घेण्याबाबत केस टू केस प्रकरण निहाय निर्णय घेण्यात येईल.

8) जे गुन्हे मागे घेतलेले आहेत परंतू न्यायालयीन पटलावर प्रलंबित आहेत त्याचा आढावा घेऊन त्याचा निर्णय घेण्यात येईल.

9) आंदोलनात मृत पावलेल्या मराठा समाजाच्या व्यक्तींच्या कागदपात्रांची पूर्तता करून नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.

पहा थेट आझाद मैदानावरुन व्हिडिओ पुढील लिंकवर https://fb.watch/bsGby-uO4-

Related Stories

राज्यसभा नेतेपद पियुष गोयल यांच्याकडे

Patil_p

‘मराठा आरक्षणावर सरकारचा अभ्यास नाही’

Archana Banage

आजारास कंटाळुन गळफास घेऊन आत्महत्या

Abhijeet Khandekar

मातेच्या दुधासाठी मागणीचा महापूर

Patil_p

झारखंडमध्ये सापडला 250 किलो सोन्याचा खजिना

datta jadhav

मुंबईत पेट्रोल दराची ‘शंभरी’कडे वाटचाल

Patil_p