Tarun Bharat

‘राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले”

ऑनलाईन टीम / नवी मुंबई

गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणावरुन मुक आंदोलन सूरु आहे. यातच ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थातील राजकिय आरक्षण रद्द केल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्याने यात अधिकच भर पडली आहे.

या मुद्यावरुन आरोप – प्रत्यारोपाच्या पराजकीय फैरी झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले आहे. ओबीसी समाजाचा विश्वासघात बंद करा. अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा ही त्यांनी दिला आहे.

मंत्री म्हणतात, हे आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोवर निवडणुका होणार नाहीत आणि दुसर्‍याच दिवशी निवडणुका जाहीर होतात.हे निव्वळ ओबीसी समाजाचा राजकिय सहभाग संपवण्याचा घाट या सरकारने घातला आहे. हे आम्ही सहन करणार नाही. असा इशारा मी राज्य सरकारला देतोय, ओबीसींचा विश्वासघात बंद करा, अशाप्रकारचं राज्य सरकारला आमचं आव्हान आहे असे ही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.

Related Stories

विवाह समारंभात जपली सामाजिक बांधिलकी

Archana Banage

केरळ सेट परीक्षेत धानय्या कौटगीमठ यांच्या पुस्तकांतून तब्बल ४० प्रश्न

Archana Banage

ठाकरे सरकारचा मोठ निर्णय : महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण होणार

Archana Banage

कोरोना संकटात योगा आवश्यक : तिजानी मोहम्मद बंदे

datta jadhav

हरिद्वार धर्म संसदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी यति नरसिंहानंद अटकेत

Archana Banage

संभाजीराजेंची दुर्गराज रायगडला भेट

Archana Banage