Tarun Bharat

राज्य सरकारने निर्णायक क्षणी हात वर केले: माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची टीका

बंगळुरू/प्रतिनिधी

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या जापत्यन्य वाढत आहे. कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास तसेच प्रशासकीय जबाबदारी पार पाडण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने होत असताना राज्य सरकारने लोकांचा त्याग केला आणि लोकांना खासगी क्षेत्रातील रुग्णालयांच्या स्वाधीन केले. राज्य सरकारची ही वृत्ती असंवेदनशील आहे. अशी टीका माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केली आहे.

कोरोना परिस्थितीत राज्य सरकारकडून अधिक सक्रियतेची अपेक्षा होती परंतु असे दिसते की राज्य सरकारने आता जनतेला रामभरोसे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार निष्क्रिय ठरले आहे आणि सर्व जबाबदारी नागरिकांवर सोपवत आहे. राज्य सरकारचे हे प्रशासकीय दुर्लक्ष आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांना रुग्णालयांमध्ये वैद्यकीय मदत मिळत नाही. लोकांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. रुग्णालयांमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण वाढत आहे. रुग्णांना योग्य आहार व पाण्याविषयी तक्रारी प्राप्त होत आहेत.

खासगी क्षेत्रातील रूग्णालयात लाखो रुपये देऊन वैद्यकीय उपचार मिळणे ही सामान्य माणसाची गोष्ट नाही. वैद्यकीय उपचार ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. राज्यात लॉकडाऊनमुळे परिस्थिती नियंत्रणात होती पण आता अनलॉकमुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. म्हणून काही अटींसह री-लॉकडाउन हा एक चांगला पर्याय आहे. परंतु यासंदर्भात मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. तसेच अशा प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत असतानाही केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती दररोज वाढवत आहेत. यामुळे महागाई वाढत आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढीस त्वरित आळा घालायला हवा. हवा असे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी म्हंटले आहे.

Related Stories

राष्ट्रीय एनआयआरएफ रँकिंगमध्ये व्हिटीयु 49 व्या क्रमांकावर

Tousif Mujawar

प्राणघातक हल्ल्यात वृद्ध ठार

Tousif Mujawar

शहरात तृतिय पंथियांचे पहिले फूड कार्ट

Amit Kulkarni

शाळांमधील गणेशमूर्तींचे विसर्जन

Patil_p

राज्यस्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेत वैभव पाटीलला सुवर्ण

Amit Kulkarni

पंचकल्याण महामहोत्सवात एकात्मतेचे दर्शन

Amit Kulkarni