Tarun Bharat

”राज्य सरकारला केवळ पार्थ पवार आणि आदित्य ठाकरे यांच्याच करिअरची चिंता, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच देणघेण नाही”

Advertisements


मुंबई \ ऑनलाईन टीम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राज्यात लाखो शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची मुले ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. अनेक विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत, केवळ नियुक्त्या न दिल्याने प्रक्रिया रखडली आहे. राज्य सरकारला केवळ पार्थ पवार आणि आदित्य ठाकरे यांच्याच करिअरची चिंता आहे, पण एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच काही देणघेण नाही, अशी टीकाही आमदार राम सातपुते यांनी केली.

आमदार राम सातपुते म्हणाले की, स्वप्निल लोणकर या तरूणाने जरी आत्महत्या केली असली तरी ती शासनाच्या कुचकामी धोरणाने केलेली हत्या आहे. सरकारचं नाकर्ते धोरण असल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलं आहे. MPSC परीक्षेची वाट पाहतायेत. ज्यांच्या परीक्षा झाल्या त्यांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. आज मुलांनी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पीएसआय परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेत, त्यांच्या मुलाखतीही झाल्या आहेत. परंतु नियुक्त्या रखडवून ठेवल्या आहेत असा आरोप आमदार राम सातपुते यांनी केला.

तसेच सरकारला विद्यार्थ्यांचं काही देणंघेणं नाही. सरकारला फक्त आदित्य ठाकरे, पार्थ पवार यांच्या करिअरची चिंता आहे. परंतु कष्टकरी, शेतकरी, मध्यमवर्गीय कुटुंबातून MPSC दिलेल्या विद्यार्थ्यांच्या करिअरचं त्यांना काही पडलं नाही. स्वप्निल लोणकर याची आत्महत्या नसून सरकारच्या कुचकामी धोरणानं केलेली हत्या आहे अशी घणाघाती टीका भाजपा आमदार राम सातपुते यांनी राज्य सरकारवर केली आहे.

आत्महत्या करण्यपूर्वी स्वप्नीलने सुसाइट नोट लिहिली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्याने आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखरडल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. २९ जून रोजी पुण्यातील फुरसंगी परिसरातील राहत्या घरात स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली.

Related Stories

सोलापुरात आज नव्या 21 कोरोनाबाधित रुग्णांची भर, रुग्णांची संख्या 456 वर

Abhijeet Shinde

एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोहिमेचा कराडला प्रारंभ

Patil_p

लखनऊमध्ये एटीएसने दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या

Abhijeet Shinde

पेट्रोल अखेर शंभरी पार

Patil_p

गुजरातमध्ये इराणी बोटीतून 250 कोटींचे हेरॉईन जप्त

Patil_p

फाटक्या जीन्स वादात कंगनाची उडी; म्हणाली…

Rohan_P
error: Content is protected !!