Tarun Bharat

राज्य सरकारी कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ

Advertisements

बेंगळूर : राज्य सरकारी कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यामध्ये 11 टक्के वाढ करण्यात आली आहे. 1 जुलै 2021 पासून लागू होईल याप्रमाणे भत्तावाढ देण्याचा आदेश मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी अर्थखात्याला दिला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱयांना सध्या 11.25 टक्के महागाई भत्ता मिळात आहे. त्यामध्ये 11 टक्के वाढ करण्यात आल्याने तो 22.25 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. भत्तावाढीचा लाभ 1.50 पेन्शनधारकांसह एकूण 6 लाख कर्मचाऱयांना होणार आहे. कोरोना परिस्थितीमुळे केंद्र सरकारने मागील दीड वर्षांपासून आपल्या कर्मचाऱयांचा महागाई भत्तावाढ रोखून धरला होता. आता सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीवरून भत्तावाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱयांच्याही भत्तावाढीला स्थगिती देण्यात आली होती. दरम्यान, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सी. एस. षडाक्षरी यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने येडियुराप्पांची भेट घेऊन निवेदन दिले होते.

Related Stories

कर्नाटक: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एमजीआरईडी येथे मॉडेल व्हिलेजचे उद्घाटन

Archana Banage

कोविड लॅबमधील कंत्राटी कर्मचाऱयांनाही भत्ता

Amit Kulkarni

कर्नाटक : परिवहन कर्मचाऱ्यांचा संप मागे

Archana Banage

कर्नाटकमध्ये लस घेतलेल्या आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू

Archana Banage

भाजपचे आमदार आनंद मामनी यांचे निधन मोदींनी व्यक्त केले दुःख

mithun mane

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर पंतप्रधान मोदींची बैठक, राज्यातील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

Archana Banage
error: Content is protected !!