Tarun Bharat

राज्य सरकार हे घोटाळ्यांचे सरकार – माजी खासदार धनंजय महाडिक

पाचगाव / वार्ताहर

राज्य सरकार हे घोटाळ्यांचे सरकार असून राज्यात अनेक घोटाळे सुरू आहेत. राज्य सरकार स्वतःची कामे स्वतः न करता सर्व गोष्टी केंद्र सरकारवर ढकलत असून द्वेषाचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे प्रतिपादन माजी खासदार धनंजय महाडिक यांनी मोरेवाडी येथे केले.

मोरेवाडी येथे रविवारी दुपारी कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले केंद्र शासनाच्या अनेक लोकोपयोगी योजना आहेत .त्या कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. तसेच आपण केवळ निवडणुकीपुरते काम न करता आपले काम बारा महिने सुरूच असल्याचे सांगितले.

कोल्हापूर दक्षिण कार्याध्यक्षपदी नव्याने निवड झालेले आशिष पाटील यांनी माजी आमदार अमल महाडिक यांना पुन्हा आमदार आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांना खासदार बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन केले. कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी आणि कोल्हापूरकरांच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर असल्याचे सांगितले. कार्याध्यक्ष आशिष पाटील यांनी प्रास्ताविक केले. आभार पृथ्वीराज जाधव यांनी मानले. यावेळी जयराज निंबाळकर, नियाज नदाफ, तानाजी पाटील, रमेश चौगले, अमोल गवळी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

कोल्हापूर : अन्यथा रविवारपर्यंत दूध विक्री बंद

Archana Banage

मेट्रोच्या अर्धवट कामाचं उद्घाटन होतंय, पण…

datta jadhav

कोडोलीत देशी दारू दुकानात बारा हजाराच्या दारूची चोरी

Archana Banage

सोलापुरात आज 49 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, तिघांचा मृत्यू

Archana Banage

धनगरी ढोल, गजनृत्याने अहिल्यादेवी, शाहूंना अभिवादन

Archana Banage

तामगाव येथील महालक्ष्मी गृह उद्योगावर एलसीबी व पुरवठा विभागाची संयुक्त कारवाई

Abhijeet Khandekar