Tarun Bharat

राज कुंद्रांच्या अडचणी वाढल्या?; चार कर्मचारी बनणार मुख्य साक्षीदार

मुंबई/प्रतिनिधी

पॉर्न चित्रपट निर्मिती प्रकरणी अटकेत असलेल्या उद्योगपती राज कुंद्रा यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. कारण पॉर्न चित्रपट निर्मिती रॅकेट प्रकरणात चार कर्मचारी मुख्य साक्षीदार बनले आहेत.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आलेल्या पॉर्न चित्रपट निर्मिती रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रांना अटक केली. या अटकेनंतर मोठी खळबळ उडाली. राज कुंद्रा हेच या रॅकेटचे मुख्य सूत्रधार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पॉर्न चित्रपट निर्मिती आणि अॅप्स प्रकरणात मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा यांना अटक केल्यानंतर वेगवेगळी माहिती समोर येऊ लागली आहे. यासंबंधीचे पुरावेही मिळाले असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. या प्रकरणाला नवीन वळण लागलं असून, कंपनीतील चार कर्मचारीच या प्रकरणात मुख्य साक्षीदार म्हणून समोर आले आहेत. मुंबई पोलिसांतील सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

पॉर्न चित्रपट प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचाही जबाब नोंदवला आहे. तसंच विआन आणि दुसऱ्या कंपनीच्या कार्यालयाची झाडाझडतीही घेतली आहे. या कार्यालयात पोलिसांना एक गुप्त कपाट सापडल्याची माहिती समोर आली.

Related Stories

मराठा आरक्षण मुद्द्यावरून विरोधक आक्रमक

Tousif Mujawar

कापूस दरवाडीसाठी अनिल देशमुखांचं पियुष गोयलांना पत्र

Archana Banage

जुलै महिन्यात 9 वेळा वाढली पेट्रोलची किंमत; जाणून घ्या आजचा दर

Tousif Mujawar

कर्नाटक: इंदिरा कॅन्टीनमार्फत २४ मे पर्यंत मोफत भोजन

Archana Banage

सांगली जिल्हय़ात चौघांचा मृत्यू, नवे 34 रूग्ण

Archana Banage

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना बाधितांची संख्या 9888 वर

Tousif Mujawar