Tarun Bharat

राज कुंद्राला दिलासा नाहीच; जामिन अर्जावर 20 ऑगस्टला सुनावणी

ऑनलाईन टीम / मुंबई :

अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणी अटकेत असलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्राच्या अडचणींमध्ये दिवसागणिक वाढच होत चालली आहे. राज कुंद्रा सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. राजने आणि त्याचा साथीदार रायन थॉर्पे यांनी जामिन मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर आज, मंगळवारी सुनावणी होणार होती. परंतु न्यायालयाने राज कुंद्राच्या जामिनावरील सुनावणी 20 ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे राज कुंद्रा यांच्यासह त्यांचे आयटी सहकारी रायन थोरपे या दोघांना अजूनही काही दिवस ऑर्थर रोज तुरुंगातच रहावे लागणार आहे. याआधीही राज कुंद्राने दंडाधिकारी न्यायालयासमोर जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु त्याचा जामिन अर्ज न्यायालायने फेटाळून लावला होता.

दरम्यान, राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी रात्री उशिराने राज कुंद्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची चौकशी करून त्याला अटक केली. राजला अटक केल्यानंतर दुसऱयाच दिवशी त्याचा साथीदार रायन थॉर्पेला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत शर्लिन चोप्रा आणि गहना वशिष्ठ यांचीही चौकशी झाली आहे. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर त्याच्या वकीलांनी त्याला झालेली अटक ही बेकायदा असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. पोर्नोग्राफी प्रकरणी फेब्रुवारी महिन्यातच गुन्हा नोंदवण्यात आला होता आणि काही जणांना अटकही झाली होती.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी शिल्पाने एक निवेदन जारी केले होते. शिल्पा शेट्टीनेही तिच्या सोशल मीडियावर या प्रकरणाबाबत पोस्ट केली आहे, ज्यात तिने म्हटले आहे की तिला असे वाटते की लोक तिच्या कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी करत आहेत जे पूर्णपणे चुकीचे आहे. प्रकरण अजूनही कोर्टात आहे, त्यामुळे त्यांच्या निर्णयापर्यंत कोणी पोहोचू नये, असे म्हटले होते.

Related Stories

रिकी केज, फालू शाह यांना ग्रॅमी पुरस्कार

Patil_p

‘मिर्झापूर’वरून आता तांडव

Amit Kulkarni

विवाह तुमचा, खर्च आमचा

Amit Kulkarni

‘शिव शास्त्री बलबोआ’चा ट्रेलर प्रदर्शित

Amit Kulkarni

‘भोला’ चित्रपट 30 मार्चला झळकणार

Patil_p

ड्रग्ज कनेक्शन : शौविक चक्रवर्तीकडून पुन्हा एकदा जामीनासाठी अर्ज

Tousif Mujawar
error: Content is protected !!