Tarun Bharat

राज गावडे ‘मि.बॉडीलाईन’चा मानकरी, संदीप अंगडी उत्कृष्ट पोझर

Advertisements

सागर हादीमनी बनला मि. गोकाक, याकुब बेपारी उत्कृष्ट पोझर

क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

गोकाक येथे बेळगाव जिल्हा शरीरसौ÷व संघटना व तालुका शरीरसौ÷व संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गोकाक तालुकास्तरीय शरीरसौ÷व स्पर्धेत राज गावडे (खानापूर) याने मि. बॉडीलाईन हा मानाचा किताब पटकाविला तर संदीप अंगडी याने उत्कृष्ट पोझरचा मान मिळविला.

मि. गोकाक स्पर्धा ही दोन गटात घेण्यात आली. 55 किलो गटात 1) याकुब बेपारी 2) मुस्ताक मुजावर, 3) अल्ताफ, 4) गोपाळ भावी, 5) सादीक मुजावर. 55 किलोवरील गटात – 1) सागर हादीमनी, 2) अश्पाक पाच्छापुरे, 3) नदीम मालदार, 4) विनायक, 5) संदीप सातपुते यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविले. मि. गोकाक किताब सागर हादीमनीने पटकाविला तर उत्कृष्ट पोझरचा बहुमान याकुब बेपारीला देण्यात आला.

 गोकाक येथे आयोजित आयबीबीएफच्या नियमानुसार चार वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली. 55 किलो -1) शहानूर हुसेन, अंकली, 2) एकनाथ पाटील खानापूर, 3) विजय पाटील कडोली, 4) राहुल दाणोजी मोदगा, 5) सचिन कुंभार खानापूर. 60 किलो गट – 1) तौशिफ मुजावर पिरनवाडी, 2) कंबार इरानी घटप्रभा, 3) सोमनाथ बिर्जे मच्छे, 4) याकुब बेपारी गोकाक, 5) यश शिंदे निपाणी. 65 किलो गट- 1) सुनील भातकांडे ग्रामीण, 2) सागर हादीमनी गोकाक, 3) बसवराज कंग्राळकर कलखांब, 4) संदीप अंगडी खानापूर, 5) शिवकुमार पाटील मच्छे. 65 किलोवरील गट -1) राज गावडे खानापूर, 2) सनी मयेकर खानापूर, 3) सागर पाटील चिकोडी, 4) नितीन पाटील खानापूर, 5) विनय डोनकरी आगसगे यांनी अनुक्रमे क्रमांक मिळविले.

त्यानंतर मि. बॉडीलाईन किताबासाठी शहानूर हुसेन, तौशिफ मुजावर, सुनील भातकांडे, राज गावडे यांच्यात अटीतटीची लढत झाली. आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर राज गावडेने मि. बॉडिलाईन किताब पटकावला. संदीप अंगडीने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला. या दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुणे संजय देवरमनी, रमेश कळ्ळीमनी, काटेश गोकावी, लखन पुजारी, एम. गंगाधर, सुनील राऊत, बसवराज अरळीमट्टी, हेमंत हावळ, वासुदेव साखळकर, रियाज चौगुला यांच्या हस्ते मानाचा किताब, चषक, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Related Stories

ग्रामीणला दिलासा, पण निपाणीत धास्तीच

Patil_p

बिम्समध्ये 200 बेड्स वाढविणार

Amit Kulkarni

तान्हुल्यासह बेळगाव विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

Patil_p

बेळगावच्या सायकलस्वारांना सुपर रँडोन्यूएर किताब

Amit Kulkarni

मुख्यमंत्री उद्या बेळगाव दौऱयावर

Amit Kulkarni

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिलीप कुरुंदवाडे

Amit Kulkarni
error: Content is protected !!