Tarun Bharat

राज ठाकरेंकडून सर्व कार्यकर्त्यांना सूचना

ऑनलाईन टीम / मुंबई :

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. या काळात लोकांच्या मदतीसाठी अनेक जण पुढे येत आहेत. मात्र काही जण आपण केलेल्या मदतीचे फोटोसेशन करत असल्याचे चित्र आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रश्न विचारत मनसे कार्यकर्त्यांसह, सर्वांचेच कान टोचले आहेत. 

आपण त्यांना मदत करतो, त्यांचा चेहरा दाखवून त्यांना लाजवत नाही का? गॉगल लावून स्वतः सह मदत स्वीकारणार्यांचे फोटो काढणं योग्य आहे का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे. 


काही मोजके लोकं आहेत जे कॅमेरा कडे बघून मदत कार्याचे फोटो काढणे, मदत स्वीकारणाऱ्याला कॅमेरा कडे बघण्यास सांगणे किवा गॉगल घालून मदत कार्याचे फोटो काढणे असे चुकीचे प्रकार करत आहेत. असं म्हणत राज ठाकरे यांनी अशा प्रकारे फोटो न काढण्याचे आवाहन ट्विट द्वारे सर्व पक्षांच्या कार्यकर्त्याना‌ केले आहे. 

या संकट काळात सर्वजण एकमेकांना मदत करत आहेत. महाराष्ट्र सैनिक गरजूंच्या मदतीसाठी धावून आले आहेत. त्यांची छायाचित्रही एमएनएस च्या अधिकृत माध्यमातून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या त्या भागातील लोकांना गरज असल्यास कोठे संपर्क करावा, कोणाशी संपर्क साधावा या हेतूने हे करण्यात येणार असल्याचे राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

तसेच आजची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे काही जणांना नाईलाजाने मदत घ्यावी लागत आहे. अशा वेळेस त्यांचे छायाचित्र काढून, त्यांची मान शरमेने खाली घालवणे किती योग्य आहे? तसेच मदतकर्त्याने देखील आपला फोटो करणे हे कितपत योग्य आहे असा सवाल ही त्यांनी यावेळी केला. 

Related Stories

कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला

datta jadhav

‘SIGNAL’ पडला…

datta jadhav

जगातील सामर्थ्यवान महिलांमध्ये एंजेला मार्केल प्रथम स्थानी

datta jadhav

सांगली जिल्हा कारागृहातुन कैदी पळाला, खुनातील संशयीत पळाल्याची तक्रार दाखल

Rahul Gadkar

ब्रिटनहून भारतात परतलेल्या 20 जणांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन

datta jadhav

ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे अमेरिकेत निधन

datta jadhav