Tarun Bharat

राज ठाकरेंच्या नावे खंडणी मागणारी टोळी गजाआड

मुंबई/प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या टोळीला मुंबईतल्या मालवणी पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या (arrested) आहेत. अटक करण्यात आलेल्यांच्या मध्ये मराठी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि त्यांच्या चालकाचा समावेश आहे. दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माते युवराज बोऱ्हाडे आणि चालक सागर सोलनकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एका मराठी अभिनेत्रीलाही नोटीस बजावल्याचं सांगितलं जात आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपींनी मड परिसरातल्या एका बंगल्याच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती आणि या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केला. सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तिघांना अटक केली.

दरम्यान, ही महिला तू राज ठाकरेंना ओळखत नाहीस? काम कोणासाठी करतोयस? महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये राहतोयस ना तू? असे म्हणत, एका सुरक्षारक्षकाला मारहाण करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावाने खंडणी मागितल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. याच प्रकरणी सध्या मुंबईतील मालवणी पोलीसांकडून सिनेसृष्टीतील तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यामध्ये दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माता युवराज बोराडे आणि चालक सागर सोलणकर यांनाही अटक केली आहे. तसेच पोलीसांनी याप्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला देखील नोटीस पाठवली आहे. ही अभिनेत्री मनसेची कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातंय.

या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनुराग दिक्षीत यांनी माहिती दिली आहे. सुरक्षारक्षकाच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यातल्या महिलेला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं होतं. मात्र ती रात्री आली नाही, म्हणून तिला आता पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली आहे.

Related Stories

परतीचा मान्सून महाराष्ट्रातून लवकरच माघारी

datta jadhav

पुलवामा येथे सुरक्षादलावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद

Archana Banage

महामार्गावरील पथदिवे दुरुस्ती आवश्यक

Patil_p

सोमय्यांच्या मुलुंड येथील घरी आर्थिक गुन्हे शाखेची टीम दाखल

datta jadhav

मुंबईहून आलेले ‘ते’ बारा जण हद्द वादात अडकले

Archana Banage

अमरावतीत होणार जगातील सर्वात मोठा स्कायवॉक

datta jadhav