Tarun Bharat

राज ठाकरेंनी ‘या’ कारणासाठी मानले पीएम मोदींचे आभार

मुंबई \ ऑनलाईन टीम

केंद्र सरकारने हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचे सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार मानले आहेत. केंद्र सरकारकडून असंच सहकार्य मिळाल्यास आपण एकत्रितपणे या संकटावर मात करु, असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, १०० टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की.राज्यात वाढणारी कोरोनाची रूग्णसंख्या तसेच कोरोना लसीटा तुटवडा यामुळे लसीकरण मोहीमेत येणारा अडथळा ही सर्व परस्थिती पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं होत. यात त्यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याच्या मागणीसह पाच मागण्या केल्या होत्या. यात लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी केली होती.

यासोबतच केंद्राच्या या परवानगीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

Related Stories

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दलाला यश

datta jadhav

राहुल गांधींसह विरोधी नेत्यांनी इंधन दरवाढीविरोधात काढली सायकल रॅली

Archana Banage

मेट्रो 3 स्थानकांच्या नाम अधिकार हक्कांसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

datta jadhav

अनंतनाग : दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद; एका मुलाचाही मृत्यू

datta jadhav

पुन्हा मास्क, पुन्हा निर्बंध?…कोरोनाबाबत फडणवीसांची मोठी घोषणा

Abhijeet Khandekar

आमदार राजूबाबा आवळे यांची आरोग्य उपकेंद्रांना सदिच्छा भेट

Archana Banage