Tarun Bharat

राज ठाकरे यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

ऑनलाईन टीम / मुंबई : 


लॅाक डाऊन शिथिल केल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना आता राजकीय व्यक्तींच्या घरापर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरात काम करणाऱ्या दोन जणांचा कोराना तपासणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 


याआधी राज ठाकरे यांच्या दोन वाहन चालक, दोन सुरक्षा रक्षकांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे आता पर्यंत राज ठाकरे यांच्या एकूण 7 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे कृष्णकुंजमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या घरात काम करणारे कर्मचारी अधिक काळजी घेत असून ठाकरे कुंटुबियांनी देखील बाहेर जाणे टाळलं आहे.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी कृष्णकुंजपासून काही अंतरावर असलेल्या शिवसेना भवनातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर संपूर्ण शिवसेना भवन सॅनिटाईज करण्यात आले होते. 

Related Stories

येत्या दोन ते तीन दिवसात नुकसान भरपाई जाहीर करणार : मुख्यमंत्री

Archana Banage

शिवसेनेच्या 53 आमदारांना विधिमंडळ सचिवांची नोटीस

datta jadhav

आता 21 ऐवजी 3 दिवस ड्राय डे

datta jadhav

महाराष्ट्रात 2 लाख 6 हजार 619 रुग्ण कोरोनाबाधित

Tousif Mujawar

दिल्ली : एकाच दिवसात 5 पोलिसांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

राणा दाम्पत्याने आता जेलमध्ये हनुमान चालीसा पठण करावी

datta jadhav