Tarun Bharat

राणी चन्नम्मा विद्यापीठाचा पदवीदान समारंभ 5 रोजी

प्रतिनिधी/ बेळगाव

राणी चन्नम्मा विद्यापीठाचा आठवा पदवीदान समारंभ सोमवार दि. 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता सुवर्णविधानसौधच्या सभागृहात होणार आहे. या समारंभासाठी राज्यपाल व कुलपती वजुभाई वाला उपस्थित राहणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथनारायण व नॅकचे संचालक प्रा. एस. सी. शर्मा यांनाही निमंत्रीत करण्यात आले आहे, अशी माहिती कुलगुरु प्रा. एम. रामचंद्रगौडा यांनी दिली.

यावषी 79 विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली आहे. पदवीदान समारंभात राज्यपालांच्या हस्ते दरवषी पदवी देण्यात येते. मात्र यंदा कोविडमुळे 11 विविध विभागाच्या 11 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल. यंदा स्नातक (युजी) व स्नातकोत्तर (पीजी) विभागात 22 सुवर्ण पदके देण्यात येणार आहेत. सुवर्णसौधच्या मुख्य सभागृहात फक्त 100 जणांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल तर दुसऱया सभागृहात पत्रकार आणि अन्य निमंत्रीतांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. एलईडीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

अविनाश पाटील यांचे पक्षीप्रेम

Amit Kulkarni

सामाजिक कार्यकर्त्यांची पोलिसांसाठी पाणी सेवा

Amit Kulkarni

मुख्याध्यापक एस. बी. पाटील यांना तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार

Patil_p

राष्ट्रीय स्पर्धेत डायनॅमिक शुटोकॉन कराटेपटूंचे यश

Amit Kulkarni

रस्ता दुरुस्तीसाठी किल्ला प्रवेशद्वार वाहतुकीस बंद

Amit Kulkarni

लिंगराज कॉलेजमध्ये हिजाबवरून वाद

Tousif Mujawar