Tarun Bharat

राणेंना दिलासा; बंगल्यावरील कारवाई तुर्तास टळली

ऑनलाईन टीम / मुंबई :

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधिश’ बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर सध्या कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश मुंबई हायकोर्टाने पालिकेला दिले आहेत. त्यामुळे राणेंना तुर्तास दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे अनधिकृत बांधकाम 15 दिवसात हटविण्याचे आदेश मुंबई पालिकेने राणेंना दिले होते. दरम्यान, राणेंनी या बंगल्यावरील हातोडा टाळण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आज या याचिकेवर सुनावणी झाली. हायकोर्टाने तुर्तास राणे यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत.

हायकोर्टाने पालिकेच्या नोटीसला उत्तर देताना म्हटले आहे की, राणेंनी आपलं बांधकाम नियमित करण्यासाठी पालिकेकडं जो अर्ज केला आहे, त्यावर कायदेशीररित्या पालिकेनं सुनावणी घेऊन निकाल देणं बंधनकारक आहे. ती सुनावणी घेऊन त्यांनी तातडीनं निकाल द्यावा आणि हा निकालही नारायण राणेंच्या विरोधात गेला तर त्यावर तीन आठवडय़ांपर्यंत कुठलीही कारवाई करु नये. हायकोर्टाच्या या निर्णयामुळं पुढील तीन आठवडय़ात नारायण राणे यांच्याकडे पुन्हा कोर्टात दाद मागण्याचा पर्याय खुला झाला आहे.

Related Stories

कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश घोषित करा : उद्धव ठाकरे

Tousif Mujawar

उपमुख्यमंत्र्यांकडून माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!

Tousif Mujawar

युपीए अध्यक्षपदाची जबाबदारी घेणार नाही, पण…; शरद पवार

Archana Banage

काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का? : देवेंद्र फडणवीस

prashant_c

पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा जागीच मृत्यू

Tousif Mujawar

सानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा

datta jadhav