Tarun Bharat

राधानगरी तालुक्यात साकारतोय ऊस उत्पादन वाढीचा प्रयोग

आवळी बुद्रुक / प्रतिनिधी

कमी ऊस उत्पादन घेणाऱया शेतकऱ्यांना कृषी विभाग व विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून एकरी 60 टन उत्पादन घेण्यासाठी शुगर केन नर्सरीद्वारे कमी खर्चात ऊस लागण करणे, त्याचबरोबर ऊस उत्पादन वाढ मोहीम राबवण्यात आली आहे. सावर्धन येथे या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे म्हणाले, एकरी 60 टन मोहीम राबवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्याकरता कृषी विभागच्या सहाय्याने शेतकयांना योग्य ते मार्गदर्शन घेऊन कमी खर्चात जास्त उत्पादन घेऊन आर्थिक घडी मजबूत करावी. मंडळ कृषी अधिकारी विलास कलीकते म्हणाले, माती परीक्षण करून योग्य बियाणे निवडणे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत मोठ्या प्रमाणात वापर करावा. कृषी सहाय्यक अमोल कांबळे यांनी बीज प्रक्रिया बाबत रासायनिक, जैविक बीज प्रक्रिया याविषयी शेतकऱयांना सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास पोलीस पाटील सिताराम पाटील, कृषी विभागाचे आत्मा साहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनील कांबळे, कृषी सहाय्यक मनोज गवळी, राहुल पाटील, युवराज पवार, सविता बकरे, निखिल पाटील, एम. एस. कांबळे व तालुक्यातील प्रगतशील शेतकरी व शेतकरी मित्र मोठा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

Kolhapur : नवरदेवाची वरात मतदान कक्षाच्या दारात

Abhijeet Khandekar

भारतीय कोरोना लस सुरक्षित – संजयबाबा घाटगे

Archana Banage

एसटी थांबली, प्रवाशी खोळंबले

Archana Banage

डिव्हिडंड मंजूरीचे अधिकार संचालक मंडळाला द्या : आ. ऋतुराज पाटील

Archana Banage

शाहूवाडी तालुक्यातील भेडसगावात गोहत्या; एकजण अटकेत

Archana Banage

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष थॉमस कांबळे यांचे निधन

Archana Banage