Tarun Bharat

राधानगरी प्रांत प्रसेनजीत प्रधान लाचलुचपतच्या जाळ्यात

11 लाखांची मागणी, साडेपाच लाख पहिला हप्ता

कोल्हापूर : प्रतिनिधी 

क्रशर विरोधातील तक्रार अर्जाची निर्गत करण्यासाठी सरपंचाद्वारे साडे पाच लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या राधानगरी प्रांतासह फराळे सरपंच यांना लाचलुचपतने जेरबंद केले. ही कारवाई राधानगरी प्रांत प्रसेनजीत बबनराव प्रधान व फराळे सरपंच संदीप जयवंत डवर यांच्यावर केली आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूरचे पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुदवंत यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराने याबद्दल ७ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे याबाबत तक्रार दिली.

त्यानुसार तक्रारदाराचा राधानगरी तालुक्यात सिलीका वॉशिंग प्लँट आहे. त्या संबधी ग्रामपंचायतने त्यांना नोटीस काढली होती. त्यावरुन प्रांत कार्यालय राधानगरी यांनी ही त्यांना नोटीस काढली हाेती. यावेळी प्रांत अधिकारी प्रसेनजीत बबनराव प्रधान यांना भेटले होते. यावेळी प्रांतअधिकाऱ्यांनी त्यांना फराळे सरपंचांना भेटण्यास सांगितले होते. त्यानंतर तक्रारदार सरपंच फराळेला भेटला असता सरपंच संदीप डवर याने तक्रारदाराकडे प्रांतासाठी १० लाख रुपये व स्वत:साठी प्रतिमहीन्याला १ लाख रुपये अशी एकूण ११ लाखाची मागणी केली होती.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभागाने प्रांतकडे याची पडताळणी केली असता या मागणीला प्रांत यांनी संम्मती दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामूळे याबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचत फराळे सरपंच संदिप डवर याला ५ लाख प्रांतसाठी व ५० हजार स्वत:साठी अशी साडे पाच लाखाची रक्कम स्विकारताना कारवाई केली. असून राधानगरी प्रांत प्रसेनजीत बबनराव प्रधान व फराळे सरपंच संदीप जयवंत डवर याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरु असल्याचे पोलीस उप अधीक्षक आदिनाथ बुदवंत यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच अशा प्रकारची मागणी नागरीकाकडे होत असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तसेच ९९३०९९७७०० या व्हाट्सएप नंबर संपर्क करण्याचे आवाहन ही यावेळी केले आहे.

Related Stories

Kolhapur; मारूलकर कुटुंबातर्फे विद्यापीठाला 35 लाखाचा निधी

Abhijeet Khandekar

राजीव सातव यांची प्रकृती स्थिर ; राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची माहिती

Archana Banage

योगी आदित्यनाथ यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचे दिले संकेत

Archana Banage

“देश राज्यघटेनवर चालतो, शास्त्रांवर नाही”; चारधाम यात्रेवरून उत्तराखंड हायकोर्टाने सरकारला फटकारले

Archana Banage

कोल्हापूर : रंकाळावेस तालीम आणि के. आर.अण्णा यांच्यातील नात खंडीत

Archana Banage

पन्हाळा पुरवठा विभागात भष्ट्राचाराचा ‘अरुणोदय’

Archana Banage