Tarun Bharat

राधानगरी, सागरेश्वर अभयारण्यात बुधवारपासून प्राणी गणना

प्राणी अभ्यासकांना सहभागी होण्याचे आवाहन

प्रतिनिधी/कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्यात बुधवारी, 17 ते 22 मार्चपर्यत 5 दिवस प्राणीगणना करण्यात येणार आहे. प्राणीगणना मोहिमेत अभ्यासक, स्वयंसेवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी व्ही. एच. माळी यांनी केले आहे.

राधानगरी, सागरेश्वर अभयारण्यात बुधवार पासून सुरू होणारी प्राणी गणना दिवस चालणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांनी वन विभागाकडे संपर्क साधावा. ट्रॉन्झिट लाईन प्राणी गणनेत सहभागी होणाऱयांचा वन क्षेत्रात 6 दिवस मुक्काम राहणार आहे. स्वयंसेवकांसमवेत वनाधिकारी सहभागी असणार आहेत. रोज किमान 5 किलोमीटर प्रवास पायी करता येणे अपेक्षित आहे. 15 ते 50 वयोगटातील व्यक्ती या मोहिमेत सहभागी होऊ शकतात. प्राणी गणना मोहिमेत 21 स्वयंसेवकांना सहभागी होता येणार आहे. अधिक माहितीसाठी विराज गावडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वन्यजीव विभागाने केले आहे.

Related Stories

काहींचा मेंदू खोटा, राज्यापालांबाबत गप्प बसणारे दोषी, उदयनराजे संतापले

Rahul Gadkar

वाघुर्डे ते नवलेवाडी दरम्यानचा रस्ता देतोय अपघातास निमंत्रण

Abhijeet Khandekar

‘स्वाभिमानीची’ १९ वी ऊस परिषद २ नोव्हेंबर रोजी

Archana Banage

उचगावातील ‘ती’ बेपत्ता चिमुकली सुखरुप

Archana Banage

वंचित विद्यार्थ्यांना त्वरित शिष्यवृत्ती मिळावी

Archana Banage

भाजपला बदनाम करण्याचं विरोधकांचं काम – केशव उपाध्ये

Archana Banage