Tarun Bharat

राधे, 83, सूर्यवंशीच्या प्रदर्शनात हिस्सेदारीचा अडथळा

Advertisements

रिलायन्सने मागितली अधिक कमाई : चित्रपटगृहमालकांचा नकार

कोरोना काळानंतर चित्रपटगृहांमध्ये जात चित्रपट पाहण्यास उत्सुक प्रेक्षकांची प्रतीक्षा वाढू शकते. सुमारे 8 महिन्यांनी चित्रपटगृह संचालकांच्या अपेक्षा जाग्या झाल्या होत्या. त्यांना सलमानचा चित्रपट ‘राधे’, अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ आणि रणवीरचा ‘83’च्या प्रदर्शनामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. पण रिलायन्स एंटरटेनमेंटने कमाईत हिस्सेदारी वाढविण्याची अट ठेवल्याने चित्रपटगृह संचालकांनी प्रदर्शनास नकार दिला आहे.

सूर्यवंशी आणि 83 चित्रपटाच्या पहिल्या आठवडय़ात होणाऱया कमाईपैकी 65 टक्के, दुसऱया आठवडय़ात 60 टक्के आणि तिसऱया आठवडय़ात 55 टक्के हिस्सा ठेवणार असल्याचे रिलायन्स एंटरटेनमेंटने म्हटले आहे. उर्वरित हिस्सा वितरक आणि चित्रपटगृह किंवा मल्टीप्लेक्समध्ये विभागला जाणार आहे.

मल्टीप्लेक्सशी चर्चा सुरू असली तरीही चित्रपटगृह संचालकांनी चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे. चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी प्रतीक्षा केल्याने कमाईचा अधिक हिस्सा ठेवणार असल्याचा युक्तिवाद रिलायन्सचा आहे. राधे यंदा ईदवेळी 13 मे, सूर्यवंशी 2 एप्रिल तर 83 हा चित्रपट जून महिन्याच्या 4 किंवा 11 तारखेला प्रदर्शित होऊ शकतो.

Related Stories

कार्तिकी गायकवाडच्या आवाजात सुख म्हणजे नक्की काय असतंचं शीर्षकगीत

Patil_p

कंगना रानौतला मुंबई पोलिसांची पुन्हा नोटीस

Rohan_P

श्रद्धा आर्य आज अडकणार विवाहबंधनात

Patil_p

‘स्कॅम 1992’ची अभिनेत्री विवाहबद्ध

Amit Kulkarni

‘इमरजेन्सी’मध्ये श्रेयसची एंट्री

Patil_p

विकी कॅटच्या फोटोवर… कमेंटस्चा पाऊस

Patil_p
error: Content is protected !!