Tarun Bharat

रानडुकरांचा उपद्रवी घोषित करण्याचे सरकारच्या निर्णयाचे शेतकऱयाकडून स्वागत

मात्र माकड जास्त उपद्रवी असल्याचे शेतकऱयांचे म्हणणे.

प्रतिनिधी /वाळपई

गेल्या दहा वर्षापासून रानटी जनावरांचा उपद्रव घोषित करण्याची मागणी सातत्याने शेतकरी बांधवांकडून होत आहे. शेवटी या प्रयत्नांना काही प्रमाणात यश आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा वनमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रानडुकरांचा उपद्रवी घोषित करण्याच्या संदर्भात असे निर्देश दिलेले आहेत. यामुळे येणाऱया काळात रानडुक्कर हा उपद्रवी म्हणून घोषित केला जाणार आहे. मात्र याबाबत सत्तरी तालुक्मयातील शेतकरी बांधवांनी रानडुकरा बरोबरच माकडांना उपद्रवी घोषित करण्याची प्रक्रिया सरकारने करावी अशा प्रकारची मागणी केली आहे. रानडुक्कर यापेक्षा माकड हा जास्त उपद्रवी ठरत असून यामुळे शेतकरी बांधवांना अनेक प्रकारच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे सरकारने माकडांना उपद्रवी म्हणून घोषित करण्यात संदर्भाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यात यावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे .

याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयात आज मोठय़ा प्रमाणात शेती बागायतीची नुकसान होताना दिसत आहे .याला सर्वस्वी रानटी जनावर हीच जबाबदार आहेत. रानडुक्कर गवेरेडे माकड शेकरू यामुळे शेतकरी बांधव पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत .गेल्या दहा वर्षापासून याबाबत सातत्याने शेतकरी बांधवाकडून मागणी होत आहे. या सर्व जनावरांना सरकारने उपद्रवी म्हणून घोषित करावी याची  मागणी होताना दिसत आहे. यासाठी अनेक वेळा शेतकरी बांधवांच्या बैठका घेतल्या. अनेकवेळा निवेदने सादर केली. या अथक प्रयत्नांना काही प्रमाणात यश आल्याचे सध्यातरी दिसत आहे. मुख्यमंत्री तथा वनमंत्री प्रमोद सावंत यांनी रानटी जनावरापैकी रानडुकरांना उपद्रवी म्हणून घोषित करण्यास संदर्भाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे शेतकरी बांधवांनी काही प्रमाणात समाधान व्यक्त केले आहे. तरीसुद्धा रानडुक्करा बरोबरच माकडांना  उपद्रवी म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सरकारने पूर्ण करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे.

अशोक जोशी

याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रगतशील शेतकरी व रानटी जनावरांचा उपद्रव घोषित करण्यासाठी आरंभलेल्या चळवळीमध्ये सक्रियपणे भाग घेणारे हेदोडे सत्तरी येथील अशोक जोशी यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकारला शेवटी जाग आलेली आहे. मात्र रानडुकराने उपद्रवी घोषित करून शेतकरी बांधवांचे समाधान होणार नाही. खासकरून माकडांना याबाबत समाविष्ट करून घेणे अत्यंत गरजेचे आहे .कारण  रानडुकरांना कदाचित शेतकरी बांधव वेगवेगळय़ा पर्यायातून नियंत्रित करू शकतो. मात्र माकडांना नियंत्रित करणे शक्मय नाही .आज सत्तरी तालुक्मयात नारळाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घसरलेले आहे. यामागे माकडांचा उपद्रव हे प्रमुख कारण असल्याचे अशोक जोशी यांनी स्पष्ट केले .यामुळे सरकारने  रानडुकरांना उपद्रवी म्हणून घोषित करण्याची दिलेले निर्देशाचे स्वागत आहेच मात्र माकडाना यामध्ये समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी शेतकरी बांधवांच्यावतीने व व्यक्त केली आहे.

रामा सावंत

कोपर्डे  येथील शेतकरी बांधव रामा सावंत यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकारच्या घोषणेचे स्वागत केले आहे. मात्र माकडांना उपद्रवी घोषित करणे तेवढेच गरजेचे असल्याची  मागणी केलेली आहे .आज मोठय़ा प्रमाणात नारळाच्या उत्पादनावर संक्रांत निर्माण झालेली आहे .यासाठी माकडच प्रामुख्याने जबाबदार आहे. माकडांना आवरणे शक्मय नाही. अनेक प्रकारचे उपाय करून बघितले. मात्र त्याचा कोणताही फायदा झालेला नाही. सरकारने माकडांना उपद्रवी घोषित केल्यास माकडांची संख्या कमी होऊन पुन्हा एकदा सत्तरी तालुक्मयांमध्ये नारळ उत्पादनाला चांगले दिवस येतील अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नारायण गावकर

कुमठोळ  येथील नारायण गावकर यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकारने रानडुकरा बरोबर माकडानाही उपद्रवी म्हणून घोषित करावे अशा प्रकारची मागणी केलेली आहे .सध्या नारळाचे दर गगनाला भिडलेले आहे .यामागचे प्रमुख कारण म्हणजे उत्पादनात मोठय़ा प्रमाणात झालेली घसरण असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. माकडांच्या उपद्रवामुळे सत्तरी तालुक्मयातील नारळ उत्पादकांवर गंभीर स्वरुपाची समस्या निर्माण झालेली आहे .पुन्हा एकदा नारळाचे उत्पादन वाढवायचे असेल तर माकडांना उपद्रवी म्हणून घोषित करा अशा प्रकारचे मागणी केलेली आहे.

आत्माराम गावस

आत्?माराम गवस यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकारने माकडांना उपद्रवी म्हणून घोषित करण्यासाठी प्राधान्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. रानटी जनावरापैकी माकड जास्त उपद्रवी आहे. यामुळे शेतकरी बांधवांना अनेक स्तरावर नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट करून त्यांना उपद्रवी म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.

Related Stories

लुईझिन फालेरो राज्यसभेवर जाण्याची शक्यता

Amit Kulkarni

बहुभाषिकता ही निसर्गाने गोव्याला दिलेली सुंदर भेट!

Amit Kulkarni

‘आयआयटी’साठी सरकारने सालाझारशाही बंद करावी

Patil_p

पणजीत स्मार्टसीटीच्या खड्यात चिरेवाहू ट्रक कलंडला

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी खुल्या मैदानात यावे

Amit Kulkarni

परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचा लोकमान्य सोसायटीतर्फे सत्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!